Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story:घर-संसार सांभाळून ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; आता बनली क्लास-वन अधिकारी

दीपा भाटी यांनी संसार, ३ मुलांची जबाबदारी, समाजाच्या टीकेवर मात करत वयाच्या ४० व्या वर्षी UPPCS परीक्षा उत्तीर्ण केली. लहान वयात लग्न झाल्यामुळे शिक्षणात खंड पडला होता, पण जिद्द मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वप्न पूर्ण...

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 23, 2026 | 07:28 PM
Success Story

Success Story

Follow Us
Follow Us:
  • ३ मुलांच्या आईने पूर्ण केले ‘ऑफिसर’ बनण्याचं स्वप्न
  • टोमणे सहन केले पण जिद्द सोडली नाही
  • वयाच्या ४० व्या वर्षी मिळवले यश
Success Story:स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते, फक्त तुमच्यात ते पूर्ण करण्याचे धाडस हवे; मग ध्येय स्वतःच मार्ग मोकळे करते.” या ओळी दीपा भाटी यांच्या आयुष्याला तंतोतंत लागू पडतात. ३ मुलांची आई, घराची जबाबदारी आणि समाजाचे टोमणे अशा सर्व परिस्थितीवर मात करत दीपा यांनी वयाच्या ४० व्या वर्षी अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

लहान वयात लग्न आणि शिक्षणात खंड

दीपा भाटी या मूळच्या उत्तर प्रदेशातील नोएडाच्या रहिवासी आहेत. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर पदवी (MA) मिळवली आहे. दीपा यांचे लग्न अगदी लहान वयातच झाले होते. लग्नानंतर घराची जबाबदारी आणि पाठोपाठ ३ मुले झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. मात्र, काहीतरी मोठे करून दाखवण्याची त्यांची इच्छा कायम जिवंत होती.

शिक्षिकेची नोकरी आणि संघर्षाला सुरुवात

संसार आणि मुलांच्या संगोपनात व्यस्त असतानाच दीपा यांनी एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. मात्र, काही कारणास्तव त्यांना ती नोकरी सोडावी लागली. याच काळात त्यांच्या भावाने त्यांना नागरी सेवा परीक्षेचा (Civil Services) मार्ग दाखवला आणि UPPCS परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तीन मुलांचे संगोपन आणि घरातील कामे सांभाळून अभ्यास करणे सोपे नव्हते, पण दीपा यांनी हार मानली नाही.

टोमणे सहन केले पण जिद्द सोडली नाही

जेव्हा दीपा यांनी पुन्हा पुस्तके हातात घेतली, तेव्हा समाजातल्या अनेकांनी त्यांना टोमणे मारले. “आता पोरं मोठी झालीत, आता काय अभ्यास करतेस?” अशा शब्दांत त्यांची थट्टा करण्यात आली. मात्र, दीपा यांनी या टोमण्यांकडे दुर्लक्ष केले. त्या दिवसभर घरकाम करायच्या आणि मिळेल त्या वेळेत स्वतःला अभ्यासात झोकून द्यायच्या.

वयाच्या ४० व्या वर्षी मिळवले यश

लग्नाच्या १८ वर्षांनंतर आणि अहोरात्र घेतलेल्या परिश्रमानंतर अखेर दीपा यांचे स्वप्न पूर्ण झाले. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी युपीपीसीएस (UPPCS) परीक्षा उत्तीर्ण केली. १६६ व्या क्रमांकासह त्यांची अधिकारी पदावर निवड झाली. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये जेव्हा त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या, तेव्हा त्यांची मोठी मुलगी १२ वीत शिकत होती. आज दीपा भाटी यांची ही संघर्षगाथा लाखो गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

मेडिकलमध्ये MBA करा आणि मिळवा ऑफिसरचा रुतबा अन् लाखांचे पॅकेज! जाणून घ्या हाय-पेईंग कोर्सबद्दल…

Web Title: Success story deepa bhati pcs officer at age 40 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • Career News
  • chanakyaniti for success
  • Exam

संबंधित बातम्या

NTA Reforms: NTA ला पूर्णपणे बंद केले पाहिजे का? युजीसीच्या माजी अध्यक्षांनी दिली अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया… नक्की वाचा!
1

NTA Reforms: NTA ला पूर्णपणे बंद केले पाहिजे का? युजीसीच्या माजी अध्यक्षांनी दिली अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया… नक्की वाचा!

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!
2

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलवरून थेट…
3

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलवरून थेट…

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले
4

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.