Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेमंड लाइफस्टाइल देणार 9 हजार लोकांना नोकऱ्या; वाचा… काय आहे कंपनीची याेजना!

रेमंड हे कपड्यांच्या व्यवसायातील एक प्रसिद्ध नाव आहे. कंपनी आता आपल्या सेगमेंटचा विस्तार करत आहे. सध्या कंपनीचे 1500 स्टोअर्स आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 23, 2024 | 09:19 PM
रेमंड लाइफस्टाइल देणार 9 हजार लोकांना नोकऱ्या; वाचा... काय आहे कंपनीची याेजना!

रेमंड लाइफस्टाइल देणार 9 हजार लोकांना नोकऱ्या; वाचा... काय आहे कंपनीची याेजना!

Follow Us
Close
Follow Us:

रेडिमेड कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेली रेमंड लाइफस्टाइल (Raymond Lifestyle) कंपनी 9 हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. नवीन स्टोअरमध्ये ही नोकरी दिली जाईल. पुढील तीन वर्षांत शेकडो नवीन स्टोअर्स उघडण्याची रेमंडची योजना आहे. या स्टोअर्समध्ये सुमारे 9 हजार लोकांची भरती होणार आहे. ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी ही माहिती दिली.

पुढील तीन वर्षांत देशभरात जवळपास 900 नवीन स्टोअर्स उघडण्याची समूहाची योजना आहे. प्रत्येक दुकानात 10 जणांची भरती केली जाईल. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला लाइफस्टाइल डिव्हिजन वेगळे केले होते. समूहाची रचना सुलभ करण्यात मदत करणे, अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि वैयक्तिक युनिट्ससाठी अधिक भांडवल चॅनेल करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

कपड्यांचा व्यवसाय वाढवणार

रेमंड हे कपड्यांच्या व्यवसायातील एक प्रसिद्ध नाव आहे. कंपनी आता आपल्या सेगमेंटचा विस्तार करत आहे. सध्या कंपनीचे 1500 स्टोअर्स आहेत. येथे रेडिमेड कपडे उपलब्ध आहेत. नवीन स्टोअर व्यतिरिक्त रेमंड लाइफस्टाइल आपल्या कारखान्यासाठी देखील भरती करणार आहे.

हे देखील वाचा – झोमॅटोवरून जेवण मागवणे महागले; प्लॅटफॉर्म फीमध्ये तब्बल 40 टक्क्यांहून अधिक वाढ!

मोठ्या परदेशी ब्रँडचा समावेश

रेमंड लाइफस्टाइल आपल्या स्टोअरमध्ये परदेशी ब्रँडच्या कपड्यांनाही प्रोत्साहन देऊ शकते. याबाबत सिंघानिया म्हणाले की, कंपनीच्या ग्राहकांमध्ये जे. सी. पेनी आणि मॅसी सारख्या कपड्यांच्या साखळ्यांचा समावेश आहे. या ब्रँड्सच्या जागतिक ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत या ब्रँड्सनी त्यांच्या कपड्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे.

एका वर्षात 1100 कोटींचा व्यवसाय

कंपनी अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये कपडे निर्यात करते. कंपनीने गेल्या वर्षी सुमारे 1140 कोटी रुपयांची विक्री केली. हा समूहाच्या एकूण कमाईचा एक दशांश आहे. सिंघानिया म्हणाले की, रेमंड लाइफस्टाइल पुरुषांच्या सूटसाठी लोकप्रिय आहे. पण आता कंपनी आपल्या फॅशन सेगमेंटमध्ये नवीन गोष्टींचा समावेश करत आहे.

बांगलादेशच्या संकटाचा काय परिणाम?

बांगलादेश तयार वस्त्र उत्पादनात जगात आघाडीवर आहे. पण सध्या हा देश राजकीय संकटातून जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कापड कारखान्यांसह जवळपास सर्वच उद्योग वाईट काळातून जात आहेत. येथील सरकार उलथून टाकले आहे. पंतप्रधान शेख हसीना देश सोडून गेल्या आहेत. देशात सध्या अंतरिम सरकार आहे. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी दंगली सुरू आहेत.

अशा परिस्थितीत बांगलादेशातील अनेक कापड कारखाने भारताकडे बघत आहेत. भारत सरकारही याबाबत पूर्णपणे तयार आहे. सिंघानिया बांगलादेशबाबत काहीही बोलले नाहीत, मात्र त्यांचे संकेत स्पष्ट आहेत. बांगलादेशात कपडे तयार करणारे काही परदेशी ब्रँड भारतात येण्यास तयार आहेत.

Web Title: Raymond lifestyle will give 9000 people jobs what is the company scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 09:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.