Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेपो दराबाबत आरबीआयचा मोठा निर्णय, वाचा… तुमच्या कर्जावरील ईएमआय वाढणार की घटणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची बैठक 7 ऑक्टोबर रोजी सुरू झाली. या बैठकीत घेतलेले निर्णय आज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास जाहीर केले. ज्यात सलग 10 व्यांदा आरबीआयकडून रेपो दर स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता देशातील कर्जदारांची कर्जावरील ईएमआय घटण्याची आशा मावळली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 09, 2024 | 02:48 PM
रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांचा बॅंकांना सतर्क राहण्याचा इशारा, वाचा... असे का म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास!

रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांचा बॅंकांना सतर्क राहण्याचा इशारा, वाचा... असे का म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास!

Follow Us
Close
Follow Us:

मागील आठवड्यात कर्जदारांना देशभरातील बॅंकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) दिलासा दिला जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता ७ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या आरबीआयच्या बैठकीत कर्जावरील व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहे. प्रामुख्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर 6.50 टक्के इतका कायम ठेवला आहे. त्यामुळे आता महागड्या ईएमआयपासून कर्जदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत सांगितले आहे की, चलनविषयक धोरण समितीच्या सहा सदस्यांपैकी 5 सदस्यांनी रेपो दरात कपात न करण्याच्या बाजूने मतदान केले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात किरकोळ चलनवाढ आरबीआयच्या सहिष्णुतेच्या 4 टक्क्यांच्या खाली असूनही, रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय कमिटीने घेतला आहे.

हे देखील वाचा – देशभरात 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार… त्याही याच वर्षात, या क्षेत्रांमध्ये असेल नोकऱ्यांची मोठी संधी!

जागतिक तणाव हा महागाईचा सर्वात मोठा शत्रू

जागतिक तणाव हा महागाईचा सर्वात मोठा शत्रू आहे. धातू आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे किरकोळ चलनवाढीचा धोका कायम आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये महागाई काहीशी वाढली आहे. बेस इफेक्टमुळे किरकोळ महागाई दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.असेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी किरकोळ महागाई दर 4.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चलनवाढीचा दर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.२ टक्के राहण्याची शक्यता आहे. असेही ते म्हणाले आहे.

चलनवाढीच्या नियंत्रणासाठी बँकेचे प्रयत्न

बँकिंग प्रकरणातील तज्ञ आणि व्हॉईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्विनी राणा यांनी रेपो दरात कोणताही बदल न करण्याच्या निर्णयावर बोलताना सांगितले की, रिझर्व्ह बँकेने 2024 मध्ये सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तर मागील काही काळात सलग 10 व्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय आरबीआयने घेतलेला आहे. दरम्यान, चलनवाढीचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार अन्नधान्य चलनवाढ अजूनही निश्चित लक्ष्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Rbi decision on repo rate loan emi increase or decrease rbi mpc meet result governer shaktikanta das

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 02:47 PM

Topics:  

  • RBI
  • Repo Rate
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Explainer: डिजिटल चलन म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?
1

Explainer: डिजिटल चलन म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?

उद्यापासून चेक काही तासांत होईल क्लिअर, बँकांची नवी क्लिअरन्स सिस्टम सुरू
2

उद्यापासून चेक काही तासांत होईल क्लिअर, बँकांची नवी क्लिअरन्स सिस्टम सुरू

रेपो दरात कोणताही बदल नाही परंतु RBI ने GDP वाढीचा अंदाज वाढवला, महागाईपासून दिलासा
3

रेपो दरात कोणताही बदल नाही परंतु RBI ने GDP वाढीचा अंदाज वाढवला, महागाईपासून दिलासा

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर
4

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.