देशभरात 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार... त्याही याच वर्षात, या क्षेत्रांमध्ये असेल नोकऱ्यांची मोठी संधी!
देशातील मानधनावर काम (फ्रिलान्स) करणाऱ्या कामगारांच्या संख्येबाबत एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, सणासुदीच्या काळात त्यांच्यासाठी अशा कामगारांना लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. अनेक उद्योगांमध्ये या कामगारांसाठी नोकरीच्या संधी असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने किरकोळ, हॉटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा या क्षेत्रामध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
फ्रिलान्स कामगार म्हणजे काय?
फ्रिलान्स कामगार हे असे कामगार असतात. जे संघटित उद्योग किंवा संघटित क्षेत्रात कायमस्वरूपी कामगार म्हणून काम करत नाहीत. परंतु वेगवेगळ्या नोकऱ्या करून पैसा कमावत असतात. आजकाल, तुमच्या आजूबाजूला दिसणारे बहुतांश कामगार हे क्विक कॉमर्स किंवा ऑनलाइन डिलिव्हरी पार्टनरच्या रूपात दिसून येत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
कोणी आणलाय हा अहवाल?
नोकऱ्यांच्या बाबतीत हा अहवाल एनएलबी सर्व्हिसेस या मानव संसाधन कंपनीने समोर आणला आहे. या माध्यमातून यंदाच्या सणासुदीच्या काळात सुमारे 10 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा – वडापाव विकून महिन्याला कमावतोय 2 लाख रुपये, …दिवसभर लागते ग्राहकांची रांग!
नोकऱ्या निर्माण होण्याची काय आहेत कारणे?
पुढील तीन महिने अर्थात डिसेंबरपर्यंत विशेष सणासुदीचा हंगाम असणार आहे. या काळात रिटेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नियुक्त्या होतात. वेअरहाऊस कर्मचारी, इन्व्हेंटरी मॅनेजर, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर, किराणा भागीदार आणि डिलिव्हरी ड्रायव्हर्ससाठी नोकरीच्या मोठ्या संधी असणार आहे. त्यामुळे हा कालावधी फ्रिलान्स रोजगारासाठी खुप महत्वाचा असणार आहे.
सर्वाधिक मागणी असताना भरपूर संधी
दसरा, दिवाळी, ख्रिसमससह नववर्ष सेलिब्रेशन हा सणासुदीचा काळ विविध वस्तूंच्या मागणीसाठी पीक काळ असणार आहे. याशिवाय हिवाळा आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी या कालावधीत या कामगारांच्या 30 टक्के अधिक नोकऱ्या आणि कामाच्या संधी निर्माण होतील. यामध्ये उद्योग-विशिष्ट ट्रेंड दिसतील आणि सर्वाधिक मागणी पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन वितरण भागीदारांची आवश्यकता असणार आहे. असेही या अहवालात म्हटले आहे.
या फक्त तात्पुरत्या नोकऱ्या असतील की कायम?
एनएलबीच्या अहवालाचा हवाला देत नामांकित वृत्तसमुहाने आपल्या वृत्तांत म्हटले आहे की, सर्व रोजगार निर्मितीपैकी 70 टक्के नोकऱ्या रोजगारांच्या हंगामी मागणीच्या स्वरूपात निर्माण केल्या जातील. तथापि, 30 टक्के नोकऱ्या असतील ज्या कायमस्वरूपी नोकऱ्यांच्या स्वरूपात असतील आणि त्यांची नियुक्ती अधिक स्थिर नोकऱ्यांच्या स्वरूपात असणार आहे.