महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान; म्हणाले...
देशातील सर्व बॅंकांची शिखर संस्था असलेल्या भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. आरबीआयने देशातील चार बड्या बॅंका आणि एसजी फिनसर्व लि. या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने एसजी फिनसर्व्ह लिमिटेडला 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित काही अटींचे पालन न केल्यामुळे कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरबीआयची या चार बॅंकांवर कारवाई
भारतीय रिझर्व बँकेने देशातील तीन सहकारी बँकांना काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यामध्ये जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड-भिंड, मध्य प्रदेश, दि. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव, महाराष्ट्र आणि श्री कलहस्ती को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक लिमिटेड आंध्र प्रदेश या बँकांचा समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, संबंधित बॅंकांना ठोठावण्यात आलेला दंड हा नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. या संस्थांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर निर्णय घेणे हा आरबीआयचा उद्देश नाही. असेही आरबीआयने म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँकेलाही १४ लाखांचा दंड
रिझर्व्ह बँकेने अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँकेला 14 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आर्थिक निकष आणि ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) बळकट करण्याच्या काही सूचनांचे पालन न केल्यामुळे बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे. अशा प्रकारची चूक लहान किंवा ग्रामीण भागातील बँकांमध्ये होते. परंतु आरबीआय ही बँकांची नियामक आहे आणि ती वेळोवेळी कारवाई करत असते.
एसजी फिनसर्व्हला 28.30 लाख रुपयांचा दंड
आरबीआयकडून आपल्या या कारवाईबाबत बोलताना सांगण्यात आले आहे की, 2022-23 या आर्थिक वर्षातील कंपनीच्या आर्थिक तपशीलांमध्ये नोंदणी प्रमाणपत्राशी (सीओआर) संबंधित विशिष्ट अटींचे पालन न केल्याचे उघड झाले आहे. जारी केलेल्या सीओआरमधील विशिष्ट अटींचे पालन न करूनही कंपनीने लोकांकडून ठेवी म्हणून पैसे घेतले आणि कर्ज दिले, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.