Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: फ्लॅट नको म्हटलं, पैसेही परत नाहीत? बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका

Thane News: ठाणे जिल्ह्यातील शहाड येथे फ्लॅट बुकिंग रद्द केल्यानंतर बिल्डरने 25 हजार रुपये कापून उर्वरित रक्कम परत करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, बँकेकडून गृहकर्ज न मिळाल्यामुळे फ्लॅट बुकिंग रद्द करणाऱ्या श्यामसुंदर वर्मा यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 16, 2026 | 04:01 PM
Thane News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Thane News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. शहाडमधील फ्लॅट बुकिंग रद्द केल्यावर ग्राहकाला पूर्ण रक्कम परत मिळणार.
  2. बिल्डरला 2.35 लाख रुपये नुकसानभरपाईसह देण्याचे ग्राहक आयोगाचे आदेश.
  3. 45 दिवसांत पैसे न दिल्यास बिल्डरला 9% वार्षिक व्याज भरावे लागणार.

Flat Booking Cancellation:  ठाणे जिल्ह्यातील शहाड येथे एका ग्राहकाने एक फ्लॅट बूक केले होते. तिथे एका माणसाने फ्लॅट बुक केला. पण काही कारणांमुळे त्याला ती बुकिंग रद्द करावी लागली. फ्लॅट बुक करताना काही छोटी गोष्ट नाही. लाखो रुपयांचा व्यवहार असतो. बुकिंग रद्द केल्यामुळे त्याला भरलेली रक्कम परत मिळणे भागच आहे. पण बिल्डर पूर्ण रक्कम देण्यास तयार नव्हता, त्यामुळे ग्राहकाने थेट ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.

बिल्डर म्हणाला, पूर्ण पैसा मिळणार नाही. ग्राहक म्हणाला, माझा पैसा पूर्ण परत पाहिजे. यावरून भांडण झालं. आणि हे भांडण थेट ग्राहक आयोगात गेलं. या प्रकरणात निकाल ग्राहकाच्या बाजूने लागला असून त्याला 2.35 लाखांची नुकसान भरपाई मिळाली. बिल्डरला 2 लाख 35 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. पण या प्रकरणामुळे बुकिंग अर्जावर असणारा Non-Refundable रकमेचा मुद्दा चर्चेत आला आहे. पण खरंच असं असतं का? हेच या केसमुळे समोर आलंय. Thane News:

नक्की काय झालं होतं?

ठाण्याच्या शहाड भागात श्यामसुंदर वर्मा यांनी एका निवासी बांधकाम प्रकल्पात फ्लॅट बुक केला होता. त्यांनी शहाडमध्ये एका बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी 1.47 लाखांची बुकिंग रक्कमही भरली होती.1 लाख 47 हजार रुपये त्यांनी बुकिंगसाठी दिले होते. पण बँकेकडून कर्ज न मिळाल्यामुळे त्यांना बुकिंग रद्द करावी लागली होती.आता फ्लॅट घ्यायचा तर बँकेचं कर्ज लागतं. वर्मा यांना बँकेने कर्ज दिलंच नाही.

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?

कर्जाशिवाय फ्लॅट कसा घेणार?

त्यांनी बुकिंग रद्द करायचं ठरवलं.बिल्डरशी बऱ्याच वाटाघाटी केल्यानंतर बिल्डर त्यांना बुकिंग रक्कम परत करण्यास तयार झाला होता, पण त्यातील 25 हजार रुपये रक्कम कापणार होता.वर्मा यांनी बिल्डरला खूप समजावलं. बिल्डर म्हणाला, ठीक आहे, पैसा देतो, पण 25 हजार रुपये कापून घेतो. वर्मा यांना हा निर्णय न पटल्यामुळे त्यांनी थेट स्थानिक ग्राहक आयोगात तक्रार केली होती.25 हजार का कापायचे? माझी काय चूक? कर्ज मिळालं नाही म्हणून बुकिंग रद्द केली, यात माझा दोष काय? असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून ते कोर्टात गेले.बिल्डर कोर्टात आलाच नाही!बिल्डरकडून युक्तिवादासाठी कुणीही उपस्थित राहीला नाही.

ग्राहक आयोगात केस चालू झाली. ग्राहक आयोगाने वर्मा यांच्याकडे असणारे सगळे पुरावे पाहिले. तसेच त्यांचे म्हणणेही ऐकले.वर्मा यांनी सगळी कागदपत्रं दाखवली. बुकिंगची पावती, बँकेने कर्ज नाकारल्याचं पत्र, सगळं काही. पण बिल्डरच्या हवाल्याने युक्तिवाद करण्यासाठी तिथे कुणीही उपस्थित राहिला नाही.बिल्डरने माणूसच पाठवला नाही. त्यामुळे हे प्रकरण ग्राहक आयोगात एकतर्फी राहिले.

बिल्डरला पूर्ण रक्कम परत करता येत नाही

जरी एखादी रक्कम नॉन-रिफंडेबल असली तरी त्यामागचे कारण बिल्डरने स्पष्ट करणे आवश्यक होते.आयोगाचं म्हणणं असं होतं, तुम्ही फॉर्मवर Non-Refundable लिहिलंय, ठीक आहे. पण का नॉन-रिफंडेबल? याचं कारण तर सांगा. तसेच वर्मा यांनी बुकिंग रद्द केल्यामुळे संबंधित बिल्डरचे असे काय नुकसान झाले, ज्यामुळे बिल्डरला पूर्ण रक्कम परत करता येत नाहीये? याचे उत्तरही आयोगाला हवे होते.

वर्मा यांनी बुकिंग रद्द केल्यामुळे बिल्डरचं नक्की काय नुकसान झालं? 25 हजाराचं नुकसान झालं का? हे बिल्डरने सांगायला पाहिजे होतं. पण बिल्डर आलाच नाही, म्हणून त्याला काहीच सांगता आलं नाही. अखेर युक्तिवाद एकतर्फी राहिल्यामुळे आयोगाने उपलब्ध पुराव्यांच्या आधाराने निर्णय जाहीर केला.वर्मा जिंकले, बिल्डरला काय द्यावं लागणार?ग्राहक आयोगाने वर्मा यांच्या बाजूने निकाल दिला. तसेच त्यांना त्यांची बुकिंग रक्कम परत करण्याचे आदेश दिले.

Gold Silver Price Crash: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव गडगडले! किंमतीत मोठी पडझड, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?

आयोगाने सांगितलं, वर्मा यांची बुकिंगची पूर्ण रक्कम परत करा. याचसह त्यांना मानसिक त्रासाची भरपाई म्हणून 20,000 रुपये तर तक्रारीचे खर्च 10,000 रुपये अतिरिक्त मिळाले.म्हणजे बुकिंगचे 1 लाख 47 हजार, वर मानसिक त्रासाचे 20 हजार, आणि केसचा खर्च 10 हजार. असं सगळं मिळून 2 लाख 35 हजाराच्या जवळपास रक्कम झाली.

विशेष म्हणजे ही संपूर्ण रक्कम जर बिल्डरने 45 दिवसांच्या आत वर्मा यांच्याकडे सुपूर्त केले नाही तर त्यावर 9% वार्षिक व्याज लागू होईल.आयोगाने बिल्डरला 45 दिवसाची वेळ दिलीय. 45 दिवसात पैसा दिला नाही, तर त्यावर 9% व्याज लागेल. हा निकाल 14 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर झाला.यातून आपण काय शिकायचं?तुम्ही पण फ्लॅट बुक करत असाल, तर फॉर्मवर Non-Refundable लिहिलंय म्हणून घाबरू नका. बिल्डरला त्याचं नुकसान दाखवावंच लागेल. नुकसान नसेल, तर पूर्ण पैसा परत मिळालाच पाहिजे. आणि बिल्डर ऐकत नसेल, तर ग्राहक आयोग आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्लॅट बुकिंग रद्द केल्यास बुकिंगची रक्कम परत मिळते का?

    Ans: होय, परिस्थितीनुसार बुकिंगची रक्कम परत मिळू शकते. बिल्डरने पैसे कापण्यामागील योग्य कारण आणि झालेले नुकसान स्पष्ट करणे आवश्यक असते.

  • Que: Non-Refundable लिहिले असल्यास पैसे परत मिळत नाहीत का?

    Ans: केवळ Non-Refundable लिहिले आहे म्हणून बिल्डरला पैसे ठेवता येतीलच असे नाही. त्यासाठी योग्य कारण आणि नुकसान सिद्ध करणे महत्त्वाचे आहे.

  • Que: श्यामसुंदर वर्मा यांनी किती रुपये बुकिंगसाठी भरले होते?

    Ans: त्यांनी फ्लॅट बुकिंगसाठी 1 लाख 47 हजार रुपये भरले होते.

Web Title: Shahad flat booking cancellation builder 235 lakh compensation rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 04:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.