sensex
नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची (Share Market Update) घसरणीनं सुरुवात झाली. सेन्सेक्स ४८२ अंकाच्या घसरणीसह ५८९६४ च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी १०३ अंकांच्या घसरणीसह १७६८१ वर बंद झाला.
[read_also content=”बदली पाहिजे असेल तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव; वीज वितरणच्या अभियंत्याने दिलेल्या धमकीमुळे लाईनमॅनने स्वतःला पेटवले आणि… https://www.navarashtra.com/crime/if-you-want-transfer-send-your-wife-upset-by-jes-harassment-lineman-commits-suicide-nrvk-267562.html”]
आज (सोमवारी) सेन्सेक्सचे टॉप-३० मधील आठ शेअर तेजीसह आणि २२ शेअर घसरणीसह बंद झाले. आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata consultancy Services) मध्ये तेजी नोंदविली गेली. तर एचसीएल, एल अँड टी, इन्फोसिस आणि विप्रोच्या शेअरमध्ये घसरण झाली. आज अदानींच्या ग्रीन-२० शेअर्समध्ये तेजी नोंदविली गेली. आजच्या घसरणीसह बीएसई सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांचा मार्केट कॅप २७५.४१लाख कोटीवर पोहोचला. गेल्या आठवड्यात मार्केट कॅप (MARKET CAP) २७४.१० लाख कोटींवर होता.
शेअर बाजारात घसरणीमुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. आज गुंतवणुकदारांच्या संपत्तीत तब्बल १.३१ लाख कोटींची भर पडली.
आजचे वधारणीचे शेअर्स – ग्रॅसिम (२.७६%), अदानी पोर्ट्स (१.८२%), जेएसडब्ल्यू स्टील (१.४३%), सिप्ला (१.३७%), यूपीएल (१.२५%)
आजचे घसरणीचे शेअर्स – एचसीएल टेक (-२.७३%), लार्सेन (-२.६९%), इन्फोसिस (-२.६५%), विप्रो (-२.१५%), एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (-१.५५%)