Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांनो! टाटा केमिकल्ससह आज खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स, बदलू शकतं तुमचं नशिब

Share Market Update: मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ३६८.४९ अंकांनी म्हणजेच ०.४६ टक्क्यांनी घसरून ८०,२३५.५९ वर बंद झाला, एनएसई निफ्टी ५० ९७.६५ अंकांनी म्हणजेच ०.४० टक्क्यांनी घसरून २४,४८७.४० वर बंद झाला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 13, 2025 | 09:12 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांनो! टाटा केमिकल्ससह आज खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स, बदलू शकतं तुमचं नशिब

Share Market Today: गुंतवणूकदारांनो! टाटा केमिकल्ससह आज खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स, बदलू शकतं तुमचं नशिब

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज १३ ऑगस्ट रोजी, बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह किंवा सपाट पातळीवर सुरु होती. मात्र अखेर या घसरणीला आज ब्रेक लागणार आहे. आज असा अंदाज वर्तवला जात आहे की, शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक पातळीवर होण्याची अपेक्षा आहे.

चीनचं नक्की चाललंय तरी काय? वर्षभरात तयार करणार ‘प्रेग्नेंट रोबोट’! मिनी रोबोट्सना नाही तर चक्क माणसांनाच देणार जन्म…

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी मजबूत आणि सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,६१९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ६४ अंकांनी जास्त होता. मंगळवारी, शेअर बाजार पुन्हा घसरणीचा मार्ग स्वीकारत खाली आला. सेन्सेक्स आणि निफ्टी देखील घसरले. सेन्सेक्स ३६८.४९ अंकांनी म्हणजेच ०.४६% ने घसरून ८०,२३५.५९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९७.६५ अंकांनी म्हणजेच ०.४०% ने घसरून २४,४८७.४० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ४६७.०५ अंकांनी किंवा ०.८४% ने घसरून ५५,०४३.७० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात भारत पेट्रोलियम, आयआरसीटीसी, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, फर्स्टक्राय, ज्युबिलंट फूडवर्क्स, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (न्याका), अपोलो हॉस्पिटल्स, कोचीन शिपयार्ड, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, व्होडाफोन आयडिया, एनएमडीसी, सुझलॉन एनर्जी, रेडिको खैतान, ऑइल इंडिया गुंतवणूकदार या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये कारट्रेड टेक लिमिटेड, झोटा हेल्थ केअर लिमिटेड, अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड, टाटा केमिकल्स लिमिटेड, बायोकॉन लिमिटेड, गॅब्रिएल इंडिया लिमिटेड, ग्रेफाइट इंडिया लिमिटेड आणि लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो आणि इन्फोसिस सारख्या प्रमुख टेक कंपन्या तसेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकिंग दिग्गजांनी ३० जून २०२५ रोजी संपणाऱ्या तिमाहीचे त्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. १३ ऑगस्ट २०२५ रोजी, भारत पेट्रोलियम (BPCL), मुथूट फायनान्स आणि IRCTC यासह ५०० हून अधिक कंपन्या तिमाही उत्पन्न जाहीर करणार आहेत.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांसाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज, डीसीबी बँक आणि हबटाऊन यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये टिबो टेक, वोक्हार्ट, हबटाउन, अ‍ॅक्मी सोलर होल्डिंग्ज आणि डिफ्यूजन इंजिनिअर्स यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market update this stocks include tata chemicals are important to investors tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Bonus Share: याला म्हणतात शेअर…! 3 शेअरवर 1 शेअर फ्री, याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
1

Bonus Share: याला म्हणतात शेअर…! 3 शेअरवर 1 शेअर फ्री, याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!
2

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित
3

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये
4

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.