1 लाख रुपये गुंतवले, 2 कोटी कमावले; 'या' 1 रुपयाच्या शेअरद्वारे गुंतवणूकदार मालामाल!
गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण विविध मार्गांचा अवलंब करत असतात. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हीच बाब लक्षात घेऊन तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी शेअर बाजारातील एका शेअरबाबत आम्ही माहिती देणार आहोत. ज्या शेअरने १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये, गुंतवणूकदारांना पाच वर्षांमध्ये तब्बल 28000 टक्क्यांनी परतावा मिळवून दिला आहे. ज्यामुळे आता या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना पाच वर्षात १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर थेट २ कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
काय आहे या शेअरचे नाव?
मल्टीबॅगर स्टॉक असलेल्या या स्टॉकचे नाव हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड असे आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ पाच वर्षात करोडपती केले आहे. पाच वर्षांपूर्वी २ ऑगस्ट 2019 रोजी कंपनीच्या स्टॉकची किंमत केवळ १ रुपये इतकी होती. जी आता तब्बल 408 रुपये इतकी झाली आहे. आज शेअर बाजारात हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली असून, तो 419.30 रुपयांवर पोहचला आहे.
हेही वाचा : “बँकांनी कापले सर्वसामान्यांचे खिसे..!” मिनिमम बॅलन्स नावाखाली कमावलेत 8500 कोटी रुपये
5 वर्षांत तब्बल 28,244 टक्के परतावा
केंद्र सरकारने मागील काही वर्षात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला आहे. ज्याचा थेट परिणाम हा त्या क्षेत्रातील कंपन्यांवरही दिसून येत आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 5 वर्षांत तब्बल 28,244 टक्के इतका मोठा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे.
हेही वाचा : अंबानींच्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल माहितीये का? आयुष्यभर कमवाल तरी…नाही होणार कमाई!
गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे झाले 2.82 कोटी
दरम्यान, एखाद्या व्यक्तीने जर हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये २ ऑगस्ट 2019 रोजी 1.45 रुपये प्रति शेअरच्या दराने 1 लाख रुपये गुंतवले असते. आणि त्याने आजपर्यंत ही रक्कम तशीच ठेवली असती. तर आज हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअर्सच्या माध्यमातून त्या गुंतवणूकदाराला तब्बल 2.82 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असती. त्यामुळे आता ज्या गुंतवणूकदारांनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. ते मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)