अंबानींच्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल माहितीये का? आयुष्यभर कमवाल तरी...नाही होणार कमाई!
आजकाल सर्वसामान्य लोकांमध्ये वीज बिलाची खूपच चर्चा होत असते. उन्हाळ्यात तर विजेचे बिल प्रचंड वाढते. हे बिल भरताना अनेकांच्या नाकी दम निघतो. मात्र, आता आशियातील सर्वात श्रीमंत आणि जगातील ११ व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील अल्टामाउंट रोडवर स्थित असलेल्या अँटिलिया हाऊसचे महिन्याचे वीज बिल कितीये तुम्हाला माहितीये का? एखाद्या कामगाराला महिना १५ ते २० हजार रुपये पगारात आयुष्यभर काम करूनही इतकी रक्कम जमा करता येणार नाही. इतक्या रकमेचे वीज बिल मुकेश अंबानी केवळ एका महिन्याला भरतात.
महागड्या घरांच्या यादीत जगात दुसऱ्या क्रमांकावर
अंबानी यांचे अँटिलिया हाऊस हे आलिशान घर जगातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, ते तब्बल 1.12 एकरात बांधण्यात आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी एखादा सामान्य माणूस आयुष्यभर जितकी कमाई आयुष्यभरही करू शकत नाही. आपल्या घराचे तितक्या रकमेचे वीज बिल मुकेश अंबानी महिनाभरात भरतात.
सर्व सोयी-सुविधांनीयुक्त बांधकाम
अंबानी यांचे मुंबई येथील अँटिलिया हाऊस हे 27 मजली इमारत सिव्हिल इंजिनिअरिंगचे अनोखे उदाहरण आहे. यात तीन हेलिपॅड, 168 कारसाठी पार्किंग, स्विमिंग पूल, स्पा, आरोग्य सेवा, मंदिर, टेरेस गार्डन, स्नो रूम, 9 महाकाय लिफ्ट आणि 50 लोक एकत्र बसण्यासाठी थिएटर अशा सुविधा आहे. अंबानी यांच्या अँटिलियामध्ये 600 कर्मचारी काम करतात. विशेष म्हणजे अंबानी यांची ही इमारत इतकी मोठी आहे की तिला उच्च दाब वीज जोडणी देण्यात आले आहे. परिणामी, अँटिलियामध्ये मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते.
बांधकामासाठी तब्बल 15,000 कोटी रुपये खर्च
अंबानी यांचे अँटिलिया हाऊस हे आठ रिश्टर तीव्रतेचा भूकंप सहन करू शकते. या आलिशान घराचे बांधकाम 2006 मध्ये सुरू झाले. तर 2010 मध्ये या घराचे बांधकाम पूर्ण झाले. हे आलिशान घर बांधण्यासाठी सुमारे 15,000 कोटी रुपये खर्च आला आहे. जगातील सर्व सुविधा या अँटिलिया हाऊसमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे अँटिलिया हाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दरमहा दीड ते दोन लाख रुपये पगार मिळत असल्याचे सांगितले जाते.
कितीये अँटिलिया हाऊसचे वीज बिल?
आता तुम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल की, मुकेश अंबानी यांच्या २७ मजली आलिशान घर असलेल्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल नेमके किती आहे? एका अहवालानुसार, अँटिलियामध्ये दर महिन्याला सुमारे 6,37,240 युनिट्स वीज वापरली जाते. म्हणजेच अँटिलियाचा दरमहा सरासरी वीजेचा खर्च हा तब्बल 70 लाख रुपये इतका आहे. ही रक्कम प्रत्येक यापेक्षा अधिक देखील असू शकते.