फोटो सौजन्य - Social Media
शार्क टँक इंडिया ४ च्या ऐतिहासिक क्षणात या शोच्या इतिहासातील सर्वांत मोठा धनादेश लिहून पियूष बन्सलने एक इतिहास रचला. त्याने एक प्रसिद्ध लाइफस्टाइल आणि एक्सेसरीज ब्रँड असलेल्या नूईचा मोठा वाटा खरेदी केला. या मोठ्या गुंतवणुकीतून शोच्या भारतीय स्टार्टअप वातावरणातील वाढता प्रभाव अधोरेखित होतो. पियूष सुरी आणि निकिता पांडे यांनी स्थापन केलेल्या नूई या ब्रँडने आपल्या स्कँडिनेव्हियन इन्स्पायर्ड डेस्क सेट्स, किमान डिझाइन्स आणि शाश्वततेप्रती कटिबद्धता याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. या ब्रँडने प्रतिष्ठेचा रेड डॉट डिझाइन अवॉर्डसह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत आणि तो आता नऊ देशांमध्ये उपलब्ध आहे.
नूई हे नाव ‘नेव्हर ऑड ऑर इव्हन’ या संकल्पनेतून प्रेरित असून त्यातून ब्रँडची सर्वसमावेशकता आणि वैश्विक अपील अधोरेखित होते. त्यांनी हा ब्रँड सादर केला तेव्हा पियूष नूईच्या नावीन्यपूर्ण उत्पादने आणि जागतिक विस्ताराच्या क्षमतांनी प्रेरित झाला होता. त्याचा सहकारी शार्क अमन गुप्ता याने पियूषला जास्त समभाग घ्यायला हवेत असा सल्ला दिला. परंतु ५१ टक्के समभागांसाठी ५ कोटी रूपयांची ऑफर त्यांनी कायम ठेवली.
नूईचे सह-संस्थापक पियूष सुरी यांनी या डीलबद्दल आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, “ही फक्त एक डील नाही तर ही एका सुंदर प्रवासाची सुरूवात आहे. शार्क टँक इंडिया हा आमच्यासारख्या उद्योगांसाठी एक अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे, ज्यातून उद्योजकांना मोठी स्वप्ने पाहून जास्त काही साध्य करणे शक्य होते. पियूष यांच्या गुंतवणुकीमुळे नूईसाठी एक पुढील मार्ग आखला गेला आहे आणि त्यांना भागीदार म्हणून स्वीकारताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांचे ज्ञान आणि मार्गदर्शन यासह आम्हाला खात्री वाटते की, नूई असंख्य उद्योजकांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करताना अधिकाधिक उंचीवर जाईल.”
शार्क टँक इंडियाच्या सीझन ४ मध्ये उल्लेखनीय शार्क्स आहेत. त्यात उद्योगातील आघाडीचे लोक जसे पीपल ग्रुपचे (शादी.कॉम) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम मित्तल, बोट लाइफस्टाइलचे सहसंस्थापक आणि सीएमओ अमन गुप्ता, एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक नमिता थापर, ओयोचे संस्थापक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल, लेन्सकार्टचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियूष बन्सल, शुगर कॉस्मेटिक्सच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनीता सिंग, इनशॉर्ट्सचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष अझर इक्बाल, एकोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वरूण दुआ, स्नॅपडील आणि टायटन कॅपिटलचे सहसंस्थापक व युनिकॉमर्सचे प्रवर्तक कुणाल बहल आणि वीबा/ व्हीआरबी कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक विराज बहल यांचा समावेश होता.
पहा शार्क टँक इंडिया ४ सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता, फक्त सोनी लिव्हवर!