Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाख महिला व बालकांना मिळणार मोफत उपचार, नीता अंबानी यांची घोषणा; वाचा… काय आहे योजना?

रिलायन्स फाऊंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, नीता अंबानी यांनी एक मोठा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामुळे देशातील महिला, लहान मुले यांना मोठा फायदा होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 27, 2024 | 03:22 PM
1 लाख महिला व बालकांना मिळणार मोफत उपचार, नीता अंबानी यांची घोषणा; वाचा... काय आहे योजना?

1 लाख महिला व बालकांना मिळणार मोफत उपचार, नीता अंबानी यांची घोषणा; वाचा... काय आहे योजना?

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असून, त्यांच्या पत्नी नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आहेत. या माध्यमातून त्या समाजकारणासाठी महत्त्वाचे काम करत असतात. या मालिकेत, रिलायन्स फाऊंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, नीता अंबानी यांनी एक मोठा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामुळे देशातील महिला, लहान मुले यांना मोठा फायदा होणार आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाद्वारे लहान मुले, किशोरवयीन आणि महिलांसाठी मोफत चाचणी आणि उपचार सुविधा पुरविल्या जातील. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त नीता अंबानी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी एक लाखाहून अधिक महिलांना मोफत चाचणी आणि उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे.

हे देखील वाचा – ‘या’ आयपीओने वाढवली गुंतवणूकदारांची धाकधूक; तुम्ही तर गुंतवले नाहीत ना पैसे!

सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त नवीन आरोग्य सेवा योजनेचा भाग म्हणून उपेक्षित समाजातील मुलांसाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये एक लाख महिलांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा समावेश आहे. याशिवाय या उपक्रमांतर्गत पुढील सेवा दिल्या जाणार आहेत.

– जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त 50,000 बालकांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.

– 50,000 महिलांसाठी स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहे.

– 10,000 तरुण किशोरवयीन मुलींसाठी मोफत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे लसीकरण केले जाणार आहे.

हे देखील वाचा – आयसीआयसीआय बँकेचा विक्रम, केवळ 3 महिन्यात बँकेला 11746 कोटी रुपयांचा नफा!

सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल 10 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी उपेक्षित समुदायातील 1,00,000 हून अधिक मुले आणि महिलांना मदत करण्यासाठी नवीन आरोग्य सेवा योजना जाहीर केली आहे.

“आम्ही मिळून रिलायन्स फाऊंडेशनचे दशक जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा, प्रगत उपचारांसह साजरे करत आहोत. कारण आम्ही भारताचे आरोग्यदायी, उज्वल भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन 10 वर्षांपासून प्रयत्न करत आहे. रुग्णालयाला जागतिक दर्जाचे बनवण्याचे आमचे ध्येय, आम्ही लिलया पुढे नेले आहे आणि एकत्रितपणे आम्ही लाखो जीवन सुधारले आहे आणि असंख्य कुटुंबांना जगण्याची उमेद दिली आहे. असेही नीता अंबानी यांनी म्हटले आहे.

Web Title: Sir hn reliance foundation hospital 10 years 1 lakh women and children will get free treatment nita ambani announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • Nita Ambani
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

The Hundred : नीता अंबानीच्या संघाने घातला धुमाकूळ! रचला इतिहास, द हंड्रेडमध्ये उभारली सर्वोच्च धावसंख्या
1

The Hundred : नीता अंबानीच्या संघाने घातला धुमाकूळ! रचला इतिहास, द हंड्रेडमध्ये उभारली सर्वोच्च धावसंख्या

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; कर्ज घोटाळ्याप्रकरणी आता बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरु, शेअर्स कोसळले
2

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; कर्ज घोटाळ्याप्रकरणी आता बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरु, शेअर्स कोसळले

सिंपल पण स्टायलिश लुक! नीता अंबानी यांनी ‘बंगलो’ रेस्टॉरंटला दिली भेट
3

सिंपल पण स्टायलिश लुक! नीता अंबानी यांनी ‘बंगलो’ रेस्टॉरंटला दिली भेट

गुलाबी मदुराई कॉटन साडी आणि क्लासी दागिने, Nita Ambani यांचा एलिगंट लुक; नजरच हटणार नाही
4

गुलाबी मदुराई कॉटन साडी आणि क्लासी दागिने, Nita Ambani यांचा एलिगंट लुक; नजरच हटणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.