
फोटो सौजन्य - Social Media
या कॅम्पेनमध्ये प्रसिद्ध फोटोग्राफर Joseph Radhik आणि वेडिंग डिझायनर Devika Narain यांच्या नात्याची प्रेरणादायी कहाणी दाखवण्यात आली आहे. अनेक डिजिटल स्टोरीटेलिंग व्हिडीओजच्या माध्यमातून त्यांच्या सहजीवनातील संघर्ष, प्रगती आणि एकमेकांना दिलेली साथ अधोरेखित करण्यात आली आहे. “आजची लग्ने म्हणजे एकत्र नवीन काहीतरी घडवण्याचा प्रवास” हा विचार या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे.
Sonata च्या नव्या वेडिंग कलेक्शनमध्ये गोल्डन-टोन डिझाईन्स, मल्टिफंक्शन डायल्स, मेटॅलिक स्ट्रॅप्स आणि आकर्षक पेअर वॉचेसचा समावेश करण्यात आला आहे. पुरुषांसाठी बोल्ड ग्रीन आणि ब्लू डायल्स तर महिलांसाठी मिनिमलिस्ट आणि ज्वेलरी-इन्स्पायर्ड डिझाईन्स सादर करण्यात आल्या आहेत. ही घड्याळे लग्नसमारंभासोबतच रोजच्या वापरासाठीही योग्य असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
Sonata चे ब्रँड हेड पुलक नारायण यांनी सांगितले की, आधुनिक जोडप्यांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. ही घड्याळे केवळ वेळ दाखवत नाहीत, तर एकत्र घडवलेल्या आयुष्याची आणि प्रगतीची साक्ष देतात, असेही त्यांनी नमूद केले. या कलेक्शनमधील घड्याळांची किंमत ₹१,४९५ ते ₹४,४९५ दरम्यान असून ती Sonata स्टोअर्स, Titan World आउटलेट्स आणि अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.