एसपीजेआयएमआरकडून टेक्नॉलॉजी अॅण्ड सोशएटल इम्पॅक्ट कॉन्फरन्सचे आयोजन, 'सर्वोत्तम इनोव्हेशन'वर चर्चेला चालना (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
S.P. Jain Institute of Management & Research Marathi News: भारतीय विद्या भवनच्या एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर), मुंबईने आपल्या मुंबईमधील कॅम्पसमध्ये २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिल्या इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी अँड सोशएटल इम्पॅक्ट कॉन्फरन्सचे यशस्वीपणे आयोजन केले.
टीएएसआयसी २०२५ मध्ये अनेक ट्रॅक, क्लोज्ड-डोअर सत्रे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन होता, ज्यामध्ये एमबीए विद्यार्थ्यांचा सहभाग होता, जो शैक्षणिक परिषदांमधील दुर्मिळ क्षण होता. यामागे जबाबदार आणि सर्वसमावेशक इनोव्हेशन्सप्रती संवादांना नव्या उंचीवर नेण्याचा मनसुबा होता. अनेक भागधारक जसे आघाडीचे जागतिक विद्वान, मुख्य इनोव्हेशन अधिकारी, सीएसआर अधिकारी, सार्वजनिक धोरण तज्ञ आणि विद्यार्थी इनोव्हेटर्स यांनी शाश्वत वित्त, जबाबदार तंत्रज्ञान व नैतिक ग्राहक वर्तन यावरील चर्चेत सहभाग घेतला. ज्यामुळे अंमलबजावणीपूर्वी तंत्रज्ञानाच्या व्यापक परिणामांचा विचार करण्यासाठी व्यवस्थापकीय टॅलेंटला संवेदनशील बनवता येईल.
एसपीजेआयएमआरचे डीन प्रो. वरुण नागराज यांनी तंत्रज्ञानाच्या व्यापक सामाजिक परिणामांवर चर्चांना चालना देण्यात शैक्षणिक संस्थांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले, ”इनोव्हेशन आणि सामाजिक परिणामांच्या एकीकरणामधून जागतिक दर्जाचे संशोधन उदयास येईल, अशी आम्हाला आशा आहे. आमचे विद्यार्थी बौद्धिक आणि नैतिक उत्साहासह पदवीधर व्हावे अशी आमची इच्छा आहे, जेथे हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. सामाजिकदृष्ट्या जागरूक इनोव्हेशन्सना चालना देण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांना एकत्र आणण्यासाठी टीएएसआयसी सारख्या परिषदा आवश्यक आहेत.”
कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या हेन्झ कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम्स अँड पब्लिक पॉलिसीचे डीन, प्रोफेसर रामय्या कृष्णन यांनी एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या धोरणात्मक परिणामांवर चर्चा केली. प्रोफेसर मायकेल लुच, जे.एस. मॅक प्रोफेसर, मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष, रेमंड ए. मेसन स्कूल ऑफ बिझनेस, विल्यम अँड मेरी यांनी ‘सर्वोत्तम वापर’बद्दल ग्राहकांचे वर्तन आणि जबाबदार वापर घडवण्यात त्याची भूमिका याबाबत मत सादर केले.
केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या वेदरहेड स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या असोसिएट डीन, रिसर्च अँड फॅकल्टी प्रोफेसर यंगजिन यू यांनी विकसित होत असलेल्या डिजिटल लँडस्केपचा आणि इनोव्हेशनवर त्याच्या परिणामांना एक्स्प्लोअर केले. प्रोफेसर जोआओ पिंटो, डीन, कॅथोलिक पोर्टो बिझनेस स्कूल, कार्यकारी समिती सदस्य, कॅथोलिक युनिव्हर्सिटी ऑफ पोर्तुगाल आणि सीईजीई सह-नेते, इनोव्हेशन इन सस्टेनेबिलिटी अँड रीजनरेशन हब, यांनी शाश्वत वित्तपुरवठ्याचे महत्त्व आणि सार्वजनिक-खाजगी वित्तपुरवठा भागीदारी व संरचना योग्य प्रकारच्या इनाव्हेशन्सना कसे चालना देऊ शकतात, तसेच कंपन्या आणि भागधारकांसाठी दीर्घकालीन आर्थिक मूल्य कसे निर्माण करू शकतात, यावर प्रकाश टाकला.
प्रोफेसर यू अशा परिषदांची आवश्यकता व्यक्त करत म्हणाले, ”तंत्रज्ञान प्रगतीच्या वेगवान गतीमुळे अशा व्यासपीठांची आवश्यकता आहे, जेथे शैक्षणिक संस्था, उद्योग व धोरणकर्ते या इनोव्हेशन्समुळे निर्माण होणाऱ्या आश्वासनांचे आणि आव्हानांचे एकत्रितपणे परीक्षण करू शकतात. टीएएसआयसी या महत्त्वपूर्ण संवादांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम करते.”
टीएएसआयसी २०२५ मध्ये तंत्रज्ञान व सामाजिक प्रभावाशी संबंधित विषयांवर पेपर आणि पोस्टर सादरीकरणांसह ‘शैक्षणिक ट्रॅक’ देखील होता. या ट्रॅकला तंत्रज्ञान व ग्राहक, तंत्रज्ञान च धोरण, तंत्रज्ञान व कंपन्या आणि तंत्रज्ञान व समुदाय यांसारख्या विषयांवर जवळपास ६० सबमिशन्स मिळाले.
इतर ब्रेकआउट सत्रांमध्ये मूल्य निर्मिती व सामाजिक फायद्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय)चा वापर करण्यावर थिंक टँक, शैक्षणिक प्रकाशन व संशोधनात रस असलेल्यांसाठी समर्पित ‘मीट द एडिटर्स’ सत्र आणि वाईज इनोव्हेशन अवॉर्ड्स यांचा समावेश होता, जेथे विद्यार्थी टीम्स मूल्यांकन करण्यात आले आणि परिणाम, स्थिरता व दीर्घकालीन व्यवहार्यतेवर आधारित इनोव्हेशन्स ओळखण्यावरील त्यांच्या सादरीकरणांसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.
एसपीजेआयएमआर वाईज टेकचे कार्यकारी संचालक मनोज मोहन म्हणाले, ”टीएएससीआय २०२५ ने शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची पोकळी भरून काढली, तसेच समाजाच्या विविध गरजांना जागरूक आणि सर्वसमावेशक असलेल्या ‘सर्वोत्तम इनोव्हेशन्स’च्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाच्या प्रभावाचे परीक्षण केले. परिषदांनी भरलेल्या या परिस्थितीत आम्ही दक्षिण आशियाचे खात्रीदायी व्यासपीठ तयार करण्यासाठी पुढाकार घेतला, जेथे सखोल विचारवंत, उद्योग नेते आणि विद्वान एकत्र येऊन इनोव्हेशन्सचा पृथ्वी व पृथ्वीवरील लोकांवर होऊ शकणाऱ्या परिणामांबाबत शोध घेतील.”
टीएएसआयसी २०२५ इनोव्हेशन व सामाजिक परिणामांवर चर्चा करण्यासाठी दक्षिण आशियातील प्रमुख व्यासपीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आणि एसपीजेआयएमआर येत्या काही वर्षांत टीएएसआयसीचा प्रभाव वाढवण्यासाठी व विस्तारण्यासाठी कटिबद्ध आहे.