शेअर बाजारात घसरणीची मालिका सुरुच; वाचा... कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज (6 डिसेंबर) पतधोरण जाहीर केले आहे. त्यात त्यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे रेपो रेट हा 6.5 टक्केच राहणार आहे. दरम्यान, आज पतधोरण जाहीर झाल्यानंतर शेअर बाजाराने काहीशी गटांगळी खाल्ली आहे. आज (ता.६) शेअर बाजार बंद होताना, घसरणीसह बंद झाला आहे.
सेन्सेक्सची 56.74 अंकांनी घसरण
आज (ता.६) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 56.74 अंकांनी घसरून, 81,709.12 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 30.60 अंकांच्या घसरणीसह 24,677 अंकांवर बंद झाला आहे. दरम्यान, आज आरबीआयचे पतधोरण जाहीर होण्याच्या आधी आणि नंतर बाजारात आज चढ-उतार सुरुच होते. यात प्रामुख्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात बरीच हालचाल दिसून आली. तर एफएमसीजी, तेल आणि वायू समभागातही चढ-उतार दिसून आले. आज प्रामुख्य़ाने एकूण शेअर्सपैकी 1694 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1127 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
सेबीकडून मिष्टान्न फूड्स लिमिटेडवर बंदी; बजावली कारणे दाखवा नोटीस!
कशी होती क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती?
आरबीआयचे पतधोरण लागू झाल्यानंतर लगेचच, बँक शेअर्स निश्चितच मजबूत दिसत होते. परंतु बाजार बंद होईपर्यंत ते लाल रंगात घसरले होते. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक या शेअर्समध्ये आज वाढ झाली होती. पण एकूणच बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूकदारांच्या पदरी निराशाच पडली. बँक, फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, मीडिया, फार्मा, हेल्थकेअर इंडेक्स आणि रिॲल्टी सेक्टरमध्ये घसरण झाली आणि बाजार बंद होण्याच्या वेळी कमजोरी दिसून आली.
सेन्सेक्सच्या शेअर्स स्थिती?
सेन्सेक्समधील 30 पैकी 14 समभाग वाढीसह बंद झाले. यामध्ये टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी, एल अँड टी, आयटीसी आणि टाटा स्टील हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर सेन्सेक्समधील घसरलेल्या शेअर्स संख्या ही 16 नोंदवली गेली आहे. त्यात अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.
एमसीएक्सच्या शेअर्सच्या किंमतीने गाठला 7,000 रुपयांचा टप्पा; शेअर्समध्ये ८ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ!
किती राहिले बीएसई बाजार भांडवल?
मुंबई शेअर बाजाराचे (बीएसई) बाजार भांडवल आज ४५९.२३ लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये 4088 शेअर्सचे व्यवहार बंद झाले. त्यापैकी 2399 शेअर्स वाढीने बंद झाले तर 1590 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 410 शेअर्स अप्पर सर्किटवर तर 191 शेअर्स लोअर सर्किटवर बंद झाले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)