2025 मध्येही कोसळू शकतो शेअर बाजार; गुंतवणुकीपुर्वी 'या' गोष्टींची काळजी घ्याच..!
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस खुपच निराशाजनक राहिला आहे. आज शेअर बाजारात निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, मिडकॅप इंडेक्स घसरणीसह बंद झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या 3 टक्के घसरणीने बाजाराची मोठी पडझड होण्यास मोठी मदत झाली आहे. रियल्टी, फार्मा, तेल आणि वायू शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आणि गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत घट दिसून आली आहे. ऑटो, मेटल आणि फार्मा निर्देशांकांच्या कमजोरीमुळेही बाजारात मंदीचा कल कायम राहिला.
कोणत्या पातळीवर बंद झाला शेअर बाजार
आज अर्थात सोमवारी (ता.4) मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 942 अंकांच्या किंवा 1.18 टक्क्यांच्या घसरणीसह 78,782.24 च्या पातळीवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 309 अंकांच्या किंवा 1.27 टक्क्यांच्या घसरणीसह 23,995.35 अंकांच्या पातळीवर बंद झाला आहे.
हे देखील वाचा – सचिन तेंडुलकरच्या 5 कोटींचे झाले 72 कोटी! ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल!
का झाली शेअर बाजारात मोठी घसरण?
भारतीय शेअर बाजारात किंचित रिकव्हरी झाल्यानंतर, निफ्टी सुमारे 175 अंकांनी सावरला होता. परंतु असे असूनही, निफ्टी 300 हून अधिक अंकांनी घसरला. ऑटो शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे आणि मेटल स्टॉकमध्ये वेदांता, हिंदाल्को आणि जिंदाल स्टील सारखे शेअर्स मोठ्या प्रमाणात बंद झाल्यामुळे बाजार सावरला नाही. निफ्टी बँकेत 458 अंकांची मोठी घसरण दिसून आली. तो 51215 च्या पातळीवर बंद झाला आहे.
सेन्सेक्स-निफ्टी समभागांची स्थिती
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स हे घसरणीसह आणि 6 शेअर्स हे वाढीसह बंद झाले. याशिवाय निफ्टीमधील 50 पैकी 42 शेअर्स घसरले आणि केवळ 8 शेअर्स हे वाढीसह बंद झाले.
हे देखील वाचा – देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा घसरला, गुजरातची मोठी झेप, वाचा… सविस्तर!
काय आहे बाजारातील मार्केट कॅपची स्थिती
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) मार्केट कॅपवर नजर टाकली असता, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये ट्रेडिंग 442.02 लाख कोटी रुपयांसह बंद झाले आहे आणि 4199 शेअर्सपैकी 2713 शेअर्सचा व्यापार घसरणीसह बंद झाला आहे. 1354 शेअर्समध्ये वाढ झाली आणि 132 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार संपला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)