भारतीयांसाठी गुडन्युज..! या क्षेत्रात आशिया, युरोप, अमेरिका... प्रत्येक ठिकाणाहून वाढतीये मागणी!
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबरमध्ये भारतातील उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑक्टोबरमध्ये 57.5 अंकांवर पोहोचला आहे. हे चीनच्या पीएमआय (50.30) पेक्षा जास्त आहे. या स्थितीत भारताने चीनला मागे टाकले आहे.
परिणामी, पूर्वी उत्पादनावर गर्व बाळगणारा चीन आता यामध्ये खूप मागे पडला आहे. एकीकडे चीनची आर्थिक वाढ अतिशय मंदावली आहे. तर दुसरीकडे भारताकडून आनंदाची बातमी आली आहे. एचएसबीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील उत्पादन क्षेत्राचा ऑक्टोबरमध्ये विस्तार झाला आहे. या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे.
जगभरातून वाढतीये मागणी
भारतातील उत्पादन क्षेत्रातील वाढीचे कारण परदेशी मागणी आहे. भारताला जगातील अनेक देशांकडून नवीन ऑर्डर तर मिळाल्याच पण विक्रीही वाढली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नोकऱ्यांची संख्याही वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये भारताला आशिया, युरोप, लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेतून अधिक ऑर्डर मिळाल्या आहे. ज्यामुळे उत्पादन क्षेत्रात तेजी दिसून आली आहे.
हे देखील वाचा – देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा घसरला, गुजरातची मोठी झेप, वाचा… सविस्तर!
चीनच्या तुलनेत किती पुढे निघाला भारत?
एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑक्टोबरमध्ये 57.5 अंकांवर पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये तो 56.5 अंकांवर होता. जो आठ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर होता. वाढती पीएमआय दर्शविते की, ऑपरेटिंग परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होत आहे. दुसरीकडे, चीनचा पीएमआय 50.30 अंक आहे. तथापि, ऑक्टोबरमध्ये चीनच्या पीएमआयमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. पण एकूण गुणांच्या बाबतीत ते भारताच्या मागे फेकला गेला आहे.
भारतात बनवलेल्या वस्तूंची मागणी वाढली
अलीकडच्या काळात जगभरात भारतात बनवलेल्या वस्तूंची मागणी वाढली आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स बुक केल्या आहेत. सध्याच्या घडीला देशातील ऑर्डरच्या संख्येने, गेल्या 20 वर्षांमध्ये प्राप्त झालेल्या ऑर्डरची सरासरी संख्या ओलांडली आहे. अहवालात म्हटले आहे की, नवीन उत्पादनांची ओळख आणि यशस्वी मार्केटिंगमुळे वस्तूंची विक्री वाढण्यास मदत झाली आहे.
हे देखील वाचा – सचिन तेंडुलकरच्या 5 कोटींचे झाले 72 कोटी! ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल!
कर्मचाऱ्यांची संख्या वाढली
भारतीय वस्तूंची मागणी वाढल्याने कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे. म्हणजे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. आकडेवारीनुसार, उत्पादकांनी ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहे. सप्टेंबरमध्ये नियुक्त केलेल्या नवीन कर्मचाऱ्यांपेक्षा ही संख्या अधिक होती. ऑक्टोबरचा डेटा संकलन जवळपास 20 वर्षांतील सर्वाधिक होता. एचएसबीसीच्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय उत्पादक भविष्यातील उत्पादन खंडांबद्दल अधिक आशावादी झाले आहेत.