Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारातील घसरण सुरुच; सेन्सेक्स 984.23 अंकांनी तर निफ्टी 324.40 अंकांनी घसरला

आज मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ९८४.२३ अंकांच्या घसरणीसह ७७,६९०.९५ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 324.40 अंकांच्या घसरणीसह 23,559.05 च्या खाली बंद झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 13, 2024 | 05:08 PM
सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा... का होतीये बाजाराची घसरगुंडी!

सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा... का होतीये बाजाराची घसरगुंडी!

Follow Us
Close
Follow Us:

आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक राहिला आहे. सेन्सेक्स-निफ्टीच्या घसरणीच्या त्सुनामीसह व्यवहार बंद झाला आहे. एफआयआयची विक्री खूप जास्त होती आणि अमेरिकन बाजारातील घसरणीच्या संकेतांमुळे, शेअर बाजारातील मूल्यांकन कमी होत आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजाराच्या हालचालीवर दिसत आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, मेटल, फार्मा सर्व खराब स्थितीत राहिले आणि नवीन विक्रम मोडत निच्चांकी पातळीवर बंद झाले.

कशी राहिली सेन्सेक्स, निफ्टीची वाटचाल

आज भारतीय शेअर बाजारात प्रामुख्याने मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ९८४.२३ अंकांच्या किंवा १.२५ टक्क्यांच्या घसरणीसह ७७,६९०.९५ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 324.40 अंकांच्या किंवा 1.36 टक्क्यांच्या प्रचंड घसरणीसह 23,559.05 च्या खाली बंद झाला आहे. टाटा मोटर्सच्या शेअर्सची घसरण वाढली आहे. पण बाजार बंद होण्याच्या वेळेस ते पुन्हा तेजीच्या हिरव्या चिन्हावर परतलेले दिसून आले.

हे देखील वाचा – रिलायन्सचा शेअर्स 70 टक्क्यांनी वाढणार? विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएच्या अहवालातून माहिती समोर!

गुंतवणूकदारांचे ६.१४ लाख कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 430.45 लाख कोटी रुपयांवर आले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 436.59 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या भांडवलात 6.14 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल बुडाले आहे.

बाजारातील क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती खराब

रिअल्टी क्षेत्र 3.17 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले आणि पीएसयू बँक क्षेत्र 3.08 टक्क्यांनी घसरले. मेटलमध्ये 2.66 टक्के आणि ऑटो शेअर्स 2.17 टक्क्यांनी घसरून बंद झाले आहे. यानंतर, बँक निफ्टीमध्ये 2.09 टक्क्यांची घसरण झाली आणि मध्य-लहान हेल्थकेअर शेअर्समध्ये 2.10 टक्क्यांच्या कमजोरीसह आजचा व्यवहार बंद झाला आहे.

बँक निफ्टीमध्येही झालीये घसरण

शेअर बाजारात आज (ता.१३) ॲडव्हान्स-डिक्लाईन रेशो आज खूपच खराब होता आणि 2300 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर्समध्ये घसरण होण्याचे प्रमाण जास्त होते. बँक निफ्टीमध्ये आजचा व्यवहार बंद होताना तो ५०,१०० च्या खाली बंद झाला आहे आणि आज त्याची निच्चांकी पातळी ५०,००० च्या खाली आहे. याचा अर्थ बाजार बंद होण्याच्या वेळेपर्यंत बँक निफ्टीमध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे, जरी तो बंद होताना 1069 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले असून, आजच्या व्यवहारात अनेक वरच्या पातळीला तडे गेले आहेत.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock market decline continues sensex fell by 984 23 points and nifty by 324 40 points

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 05:08 PM

Topics:  

  • Nifty
  • sensex
  • Stock market update

संबंधित बातम्या

Stock Market Crashed : ५ दिवसांत १६ लाख कोटी रुपये बुडाले…,’या’ 8 मोठ्या कारणांमुळे बाजार कोसळला, घसरण वाढणार की थांबणार?
1

Stock Market Crashed : ५ दिवसांत १६ लाख कोटी रुपये बुडाले…,’या’ 8 मोठ्या कारणांमुळे बाजार कोसळला, घसरण वाढणार की थांबणार?

Stock Market Today: ट्रेडिंगपूर्वी जाणून घ्या कोणत्या शेअर्सवर होणार परिणाम, आजचा बाजार कसा असणार
2

Stock Market Today: ट्रेडिंगपूर्वी जाणून घ्या कोणत्या शेअर्सवर होणार परिणाम, आजचा बाजार कसा असणार

Share Market: शेअर बाजारावर चढला GST 2.0 चा रंग, सेन्सेक्समध्ये 888 अंकांची उसळी, निफ्टीचाही तुफान वेग
3

Share Market: शेअर बाजारावर चढला GST 2.0 चा रंग, सेन्सेक्समध्ये 888 अंकांची उसळी, निफ्टीचाही तुफान वेग

Stocks Market: Nazara Tech, SBI Life सह शेअरमध्ये धमाका, चढउताराचे काय आहे कारण?
4

Stocks Market: Nazara Tech, SBI Life सह शेअरमध्ये धमाका, चढउताराचे काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.