Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Holiday: उद्या शेअर बाजार बंद राहणार! सोमवारी सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, जाणून घ्या उद्या काय चालू, काय बंद

Stock Market Holiday: गुरु नानक जयंतीनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे. त्यामुळे BSE आणि NSE वर इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि इतर संबंधित सेगमेंटमध्ये व्यवहार होणार नाहीत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 23, 2026 | 12:38 PM
Stock Market Holiday: (सौजन्य- सोशलमीडिया)

Stock Market Holiday: (सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • २४ नोव्हेंबरला BSE आणि NSE बंद
  • कमोडिटी मार्केट संध्याकाळी ५ वाजता सुरू
  • २५ डिसेंबरला वर्षातील पुढील सुट्टी
आज सोमवारी शेअर बाजारात घसरण बघायला मिळते. तरी एकूण गेल्या काही दिवसांपासून बाजाराची तेजीची गाडी सुसाट असतानाच बाजाराला ब्रेक लागणार आहे! कारण मंगळवारी, 24 नोव्हेंबरला दलाल स्ट्रीटवर शुकशुकाट असेल.

गुरु नानक जयंतीच्या सार्वजनिक सुट्टीमुळे BSE आणि NSE वर शेअर्सची खरेदी-विक्री होणार नाही. पण सगळंच ठप्प नाही. कमोडिटी आणि EGR सेगमेंटमध्ये संध्याकाळी ट्रेडिंगची संधी खुली राहील. Stock Market Holiday:

गुरु नानक जयंतीमुळे बाजाराला सुट्टी

गुरु नानक जयंती ‘प्रकाश गुरुपरब श्री गुरु नानक देव’ किंवा ‘प्रकाश पर्व’ म्हणून पण ओळखली जाते. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरु नानक देव यांचा हा जन्मदिवस आहे. NSE वर इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज, निगोशिएटेड ट्रेड रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म, म्युच्युअल फंड्स, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग स्कीम, कॉर्पोरेट बॉण्ड्स आणि न्यू डेट सेगमेंटमध्ये व्यवहार होणार नाहीत.

India Manufacturing PMI: भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची जोरदार कामगिरी; पीएमआय ९ महिन्यांच्या उच्चांकावर, ५६ वर पोहोचला

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि EGR सेगमेंटमध्ये सकाळच्या सत्रात सुट्टी असेल, पण संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11:30 किंवा 11:55 पर्यंत कामकाज चालू राहील.

पुढची सुट्टी कधी?

शनिवार-रविवार हे साप्ताहिक बंदचे दिवस तर आहेत. त्याशिवाय काही सार्वजनिक सुट्ट्यांनाही बाजार बंद असतो. सुट्ट्यांची यादी BSE आणि NSE च्या वेबसाईटवर बघायला मिळते. 2026 मध्ये आता शनिवार-रविवार सोडून पुढची सुट्टी 25 डिसेंबरला, म्हणजेच शुक्रवारी नाताळनिमित्त असेल.

सोमवारी बाजार गडगडला

निफ्टी आणि सेन्सेक्स सारख्या मोठ्या निर्देशांकांनी सुरुवातीला मोठी तेजी दाखवली होती, पण त्यानंतर खासगी आणि सरकारी क्षेत्रातल्या बँका तसेच धातू (मेटल) कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारातला उत्साह मावळला आणि निर्देशांकांनी आपली वाढ गमावली. मोठ्या बाजारात पण कमजोरी दिसून आली; निफ्टी मिडकॅप 150 आणि स्मॉलकॅप 250 हे निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते.

सकाळी 10:41 वाजता, सेन्सेक्स आपल्या दिवसातल्या उच्चांकी पातळी असलेल्या 84,662 अंकांवरून 1,400 अंशांहून जास्त घसरून 83,210 या नीचांकी पातळीवर आला. त्याच वेळी, 50 शेअर्सचा समावेश असलेला निफ्टी 0.7 टक्क्यांनी म्हणजेच 180 अंशांहून जास्त घसरून 25,600 च्या खाली आला.

Share Market Today: शेअर बाजारात गॅप-अप ओपनिंगचे संकेत! स्विगीसह ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष, तज्ज्ञांनी दिला सल्ला

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, HDFC बँक, अॅक्सिस बँक, ICICI बँक, SBI आणि अल्ट्राटेक सिमेंट सारख्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. दुसरीकडे, TCS, टेक महिंद्रा, इन्फोसिस, HCL टेक आणि मारुती सुझुकी हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: २४ नोव्हेंबरला शेअर बाजार बंद का राहणार आहे?

    Ans: गुरु नानक जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे BSE आणि NSE वरील शेअर बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत.

  • Que: २४ नोव्हेंबरला कमोडिटी मार्केट सुरू राहणार का?

    Ans: होय. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि EGR सेगमेंटमध्ये सकाळच्या सत्राला सुट्टी असेल, मात्र संध्याकाळचे ट्रेडिंग सुरू राहील.

  • Que: कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग किती वाजता सुरू होईल?

    Ans: कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि EGR सेगमेंटमध्ये संध्याकाळी ५ वाजल्यापासून ट्रेडिंग सुरू होईल.

Web Title: Stock market holiday november 24 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • sensex today
  • Stock Market Holiday
  • Stock market news

संबंधित बातम्या

Stock Market Holiday: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवड्यात सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी
1

Stock Market Holiday: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवड्यात सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.