पैसे तयार ठेवा..! चालू आठवड्यात 'हे' आठ आयपीओ गुंतवणूकदारांना करणार मालामाल!
गेल्या अर्थसंकल्पीय आठवड्यात अनेक कंपन्यांनी शेअर बाजारात आपले लॉन्च केले. अशातच आता चालू आठवड्यात देखील एकूण ८ आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे गुंतणूकदारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे या आठपैकी एक आयपीओ हा मुख्य भागातील तर ७ आयपीओ हे लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) श्रेणीतील आहे. इतकेच नाही तर चालू आठवड्यात एकूण ७ कंपन्या देखील शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे.
अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्सचा आयपीओ?
चालू आठवड्यात शेअर बाजारात अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स या फार्मा क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहे. ही कंपनी मूळची दिल्ली येथील असून, कंपनी तब्बल 1,857 कोटी रुपयांचा आयपीओ खुला करणार आहे. ३० जुलैपासून गुंतवणूकदारांना या आयपीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. १ ऑगस्टपर्यंत गुंतवणूकदारांना या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : शेअर आहे की रॉकेट..! 11 महिन्यात तब्बल 3800 टक्के परतावा; गुंतवणूकदार मालामाल!
6 ऑगस्टला होणार लिस्टिंग
6 ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर मुबंई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) लिस्टिंग होणार आहे. दरम्यान, या आयपीओच्या शेअरचा किंमत पट्टा हा 646-679 रुपये इतका असणार आहे. या आयपीओच्या माध्यामातून 680 कोटी रुपयांचे 27,345,162 नवीन शेअर्स जारी केले जाणार आहे. तर 1,176.74 कोटी रुपयांचे 17,330,435 शेअर्स हे ऑफर फॉर सेलद्वारे खुले असणार आहे.
कोणते आहेत अन्य 7 एसएमई आयपीओ
अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स व्यतिरिक्त आणखी एकूण पाच 5 एसएमई आईपीओ हे 30 जुलै रोजी खुले होणार असून, 1 ऑगस्ट रोजी ते बंद होणार आहे. यामध्ये बल्ककॉर्प इंटरनॅशनल, सथलोखर सिनर्जिस, किजी अपॅरल्स, आशापुरा लॉजिस्टिक्स, राजपुताना इंडस्ट्रीज या पाच आयपीओंचा समावेश आहे. याशिवाय ओला इलेकट्रीकच्या ६००० हजार कोटींच्या आयपीओसह आणखी अन्य एक आयपीओ देखील चालू आठवड्यात शेअर बाजारात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)