Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी खुशखबर… ‘ही’ कंपनी आणणार तब्बल 18000 कोटींचा आयोपीओ!

शेअर बाजारात रोजच नवनवीन आयपीओ दाखल होत असतात. गुंतवणुकदार देखील गुंतवणुक करण्याच्या उद्देशाने मोठ्या आयपीओवर लक्ष ठेऊन असतात. अशातच आता भारतीय फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लवकरच आपला आयपीओ शेअर बाजारात आणणार आहे. विशेष म्हणजे स्विगीचा हा आयपीओ आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक असणार आहे. त्यामुळे आता शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी तुम्हांला ही मोठी संधी असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 26, 2024 | 02:25 PM
शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी खुशखबर... 'ही' कंपनी आणणार तब्बल 18000 कोटींचा आयोपीओ!

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी खुशखबर... 'ही' कंपनी आणणार तब्बल 18000 कोटींचा आयोपीओ!

Follow Us
Close
Follow Us:

स्विगी ही भारतीय फूड डिलिव्हरी कंपनी लवकरच आपला 18000 कोटींचा आयोपीओ बाजारात आणणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एमआयसीने आपला सर्वात मोठा 21 हजार कोटी रुपयांचा आयपीओ मे 2022 मध्ये बाजारात खुला केला होता. जो आजपर्यंतचा देशातील सर्वात मोठा आयपीओ मानला गेला होता. तर तत्पूर्वी पेटीएमची पॅरेन्ट कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचा आयपीओ हा सर्वांत मोठा होता.

सर्वात मोठ्या आयपीओंमध्ये होतीये गणना

वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये आपला 18,300 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. अलिकडेच रिलायन्स कंपनी आपला ५५ हजार कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणणार आहे. तर आता स्विगी देखील आपला 18000 कोटींचा आयोपीओ बाजारात आणणार आहे. त्यामुळे आता स्विगीचा हा नव्याने दाखल होणार हा आयपीओ सर्वात मोठ्या आयपीओंमध्ये गणना जाणार आहे.

हेही वाचा – कमी भांडवलात सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय; ग्राहकांची लागेल रांग, महिन्याकाठी होईल बक्कळ कमाई!

महिनाभरात आयपीओला मंजुरी मिळण्याची शक्यता

स्विगी ही भारतीय फूड डिलिव्हरी कंपनीने आपल्या आयपीओतून 18000 कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मासायोशी सोनच्या सॉफ्ट बँकचीही स्विगीमध्ये गुंतवणूक आहे. स्विगीला एप्रिलमध्ये शेअरधारकांकडून आयपीओ लाँच करण्यासाठी मंजूरी मिळाली होती. ज्याचे उद्दिष्ट 1.25 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे होते. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, स्विगीच्या आयपीओ पेपर्सना एक महिन्याच्या आत किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत बाजार नियामकाकडून मंजुरी मिळू शकते.

हेही वाचा – कृष्ण जन्माष्टमीला सोमवारी शेअर बाजार उघडणार की बंद राहणार? वाचा… सुट्ट्यांची यादी

कुठे वापरला जाणार हा निधी

स्विगी आपल्या आयपीओच्या उत्पन्नाचा वापर आपल्या इन्स्टामार्ट व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि अधिक स्टॉक वेअरहाऊस उघडून क्विक कॉमर्स विभागात आपल्या स्पर्धक झोमॅटोशी स्पर्धा करण्यासाठी करणार आहे. यूबीएसच्या एका नवीन अहवालानुसार, जुलैमध्ये झोमॅटोची वाढ स्विगीपेक्षा अधिक वेगाने झाली. जुलैमध्ये झोमॅटो 1.6 टक्के वाढला, तर स्विगीच्या व्हॉल्यूममध्ये 4.6 टक्के घट झाली. त्यामुळे आता या दोन्ही कंपन्यांमधील स्पर्धा आणखीनच वाढणार आहे.

दरम्यान, झोमॅटोचा आयपीओ 2021 मध्ये आला होता. या आयपीओद्वारे प्रायमरी मार्केटमधून 9,375 कोटी रुपये उभारण्याचा प्लान होता. हा आयपीओ 14 जुलै 2021 ते 16 जुलै 2021 दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. तर 23 जुलै 2021 रोजी तो BSE, NSE वर लिस्टेड झाला होता.

Web Title: Stock market investors swiggy food delivery company will bring an ipo worth 18000 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 09:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.