कमी भांडवलात सुरु करा 'हा' भन्नाट व्यवसाय; ग्राहकांची लागेल रांग, महिन्याकाठी होईल बक्कळ कमाई!
भारतीय बाजारात सध्या खेळणी तयार करण्याचा उद्योग चांगलाच भरभराटीला आला आहे. विशेष म्हणजे या खेळण्यांची विदेशात निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अर्थात युरोपासह जपान आणि अमेरिकेतील मुले ही भारतीय खेळण्यांद्वारे खेळत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील या क्षेत्रात उतरुन, पंतप्रधान मोदी यांच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकतात. विशेष म्हणजे बाजारातील खेळण्यांची मागणी ही दिवसेंदिवस वाढती आहे. त्यामुळे तुम्हांला या व्यवसायात मोठे यश मिळू शकते.
सरकारचे उद्योगाला प्रोत्साहन
दरम्यान, भारतीय खेळणी बाजारावर चीनचा दबदबा आहे. मोदी सरकार हा दबदबा कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. इतकेच नाही जागतिक पातळीवर अमेरिका आणि जपानी बाजारात देखील भारतीय खेळण्यांचा दबदबा मोदी सरकारला निर्माण करायचा आहे. ज्यामुळे देशातील खेळणी बाजारातील निर्यातीमध्ये येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. त्यामुळे या उद्योगात येत्या काळात मागणी वाढतच राहणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
किती गुंतवणूक करावी लागेल?
तुम्ही हा व्यवसाय छोटेखानी स्वरुपात घरातूनच टॉयज आणि टेडी बनवण्यापासून सुरु करु शकतात. त्यातून तुम्हांला महिन्याकाठी 40,000 ते 50,000 रुपये कमाई करु शकतात. या व्यवसायासाठी तुम्हांला दोन मशीनरी खरेदी कराव्या लागतील. यामध्ये तुम्हांला कापड कापण्याची मशीन आणि शिलाई मशीन खरेदी करावी लागणार आहे. या दोन्ही मशीन तुम्हाला एकत्रितपणे १० ते १५ हाजारात मिळून जातील. याशिवाय तुम्हांला ५००० ते ७००० रुपयांचा कच्चा माल देखील खरेदी करावा लागणार आहे.
किती होईल कमाई?
दरम्यान, २५ ते ३० हजारांच्या गुंतवणूकीतून तुम्ही 100 यूनिट सॉफ्ट टॉयज आणि टेडी सहज तयार करू शकतात. एका सॉफ्ट टॉय किंवा टेडीला बाजारात ५०० ते ७०० रुपयांची किंमत सहज मिळते. अर्थात तुम्ही महिन्याला 40,000 ते 50,000 रुपये कमाई सहज करु शकतात.
आयात घटली, निर्यातीत वाढ
मीडीया रिपोर्टसनुसार, तीन ते चार वर्षापुर्वी भारतातील ८५ टक्के खेळणी ही बाहेरील देशांमधून आयात केली जात होती. मात्र, सध्या ७० टक्क्यांनी आयात कमी झाली आहे. याशिवाय भारतीय खेळणी निर्यात देखील 60 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सध्या अमेरिका, यूरोप, जपान, न्यूजीलंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्य़ा देशांमध्ये भारतीय खेळण्यांचा बोलबाला आहे.