Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता! आज सकारात्मक होणार शेअर बाजाराची सुरुवात, गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत

Share Market Update: आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. शेअर बाजारात आज आठवड्याची सुरुवात सकारात्मक दिशेने होणार आहे. याशिवाय तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची देखील शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2025 | 08:35 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता! आज सकारात्मक होणार शेअर बाजाराची सुरुवात, गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता! आज सकारात्मक होणार शेअर बाजाराची सुरुवात, गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत

Follow Us
Close
Follow Us:

१८ ऑगस्ट रोजी आज शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होणार आहे. प्रस्तावित जीएसटी सुधारणा, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठक या सर्वांमुळे शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आठवड्याच्या शेवटी झालेल्या सकारात्मक घडामोडींमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९१५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २३० अंकांचा प्रीमियम होता. शुक्रवारपासून शेअर बाजारात कोणतेही व्यवहार झाले नाहीत. आज तीन दिवसांनंतर शेअर बाजाराची सुरुवात होणार आहे. ही सुरुवात सकारात्मक दिशेने होणार असल्याने गुंतवणूकदार आनंदी आहेत. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी, शुक्रवारी भारतीय शेअर बाजार व्यवहारासाठी बंद होता. (फोटो सौजन्य – Pinterest)

गुरुवारी, भारतीय शेअर बाजार निर्देशांक किंचित वाढले, बेंचमार्क निफ्टी ५० २४,६०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ५७.७५ अंकांनी म्हणजेच ०.०७% ने वाढून ८०,५ ९ ७.६६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ११.९५ अंकांनी म्हणजेच ०.०५% ने वाढून २४,६३१.३० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक १६०.४० अंकांनी किंवा ०.२९% ने वाढून ५५,३४१.८५ वर बंद झाला.

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना HAL, UBL आणि युनायटेड स्पिरिट्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार व्होडाफोन आयडिया, केईसी इंटरनॅशनल, टोरेंट पॉवर, ग्लेनमार्क फार्मा, कोल इंडिया, जेके सिमेंट, आयनॉक्स विंड, आयआयएफएल फायनान्स, जीएमआर विमानतळ, इझमायट्रिप, वेदांत या स्टॉकवर लक्ष केंद्रित करू शकतात.

आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे उपउपाध्यक्ष मेहुल कोठारी, एसएस वेल्थच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर, एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, मदरसन सुमी वायरिंग इंडिया आणि लॉयड्स इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.

ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती

प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांनातीन तीन इंट्राडे स्टॉकची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये यूएनओ मिंडा, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर आणि आदित्य बिर्ला कॅपिटल यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी , स्टरलाइट टेक्नॉलॉजीज , टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अपटस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया आणि कमर्शियल सिन बॅग्ज यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market will start positive today know about the todays trending shares share market marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market Today: नववर्षाची धमाकेदार सुरुवात! शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ८५,४०० पार, निफ्टी २६,२०० जवळ
1

Stock Market Today: नववर्षाची धमाकेदार सुरुवात! शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ८५,४०० पार, निफ्टी २६,२०० जवळ

GDP Growth news: परदेशी गुंतवणूकदार बाहेर, तरी सेन्सेक्स ८% वधारला; भारतीय शेअर बाजाराची ताकद कायम
2

GDP Growth news: परदेशी गुंतवणूकदार बाहेर, तरी सेन्सेक्स ८% वधारला; भारतीय शेअर बाजाराची ताकद कायम

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देतील फायदा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या
3

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देतील फायदा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या

FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय?
4

FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.