ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती
आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म ChatGPT चे भारतात लाखो युजर्स आहेत. कंपनी सतत नवीन अपड्टेस आणि फीचर्स घेऊन येत असते, ज्यामुळे ChatGPT ला प्रश्न विचारणं, त्याच्याकडून माहिती मिळवणं किंवा एखाद्या समस्येचा उपाय शेधणं देखील अत्यंक सोपं झालं आहे. ChatGPT मध्ये विविध सबस्क्रिप्शन प्लॅन्स देखील उपलब्ध आहेत. तुम्ही देखील ChatGPT चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ChatGPT ने घोषणा केली आहे की, भारतीय युजर्स आता भारतीय रुपयांमध्ये ChatGPT सबस्क्रिप्शन प्लॅनचे पेमेंट करू शकता.
OpenAI ने देशात लोकल प्राइसिंगचे पायलट सुरु केलं आहे, ज्यामुळे युजर्सना डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. यापूर्वी भारतातील ChatGPT युजर्सना डॉलरमध्ये सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागतं होतं. ज्यामुळे अनेकांना सबस्क्रिप्शन प्लॅनसाठी जास्त पैसे द्यावे लागत होते. मात्र आता असं होणार नाही, आता भारतीय युजर्सना सबस्क्रिप्शनसाठी रुपयांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
पायलट प्रोग्रामअंतर्गत ChatGPT Plus प्लॅनची किंमत 1,999 रुपये प्रति महिना (GST सह) ठेवण्यात आली आहे. या प्लॅनची किंमत पूर्वी 20 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,750 रुपये होती. Pro प्लॅनची किंमत आता 19,900 रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. या प्लॅनची किंमत पूर्वी 200 डॉलर्स म्हणजेच सुमारे 17,500 रुपये होती. Team प्लॅनची किंमत 2,099 रुपये प्रति सीट प्रति महिना ठेवण्यात आली आहे. या प्लॅनची किंमत पूर्वी 30 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2,600 रुपये होती. GPT-5 लांँच केल्यानंतर काही काळाने हा बदल करण्यात आला आहे. आता भारतीय युजर्सना 12 भारतीय भाषांमध्ये चांगला परफॉर्मंस ऑफर केला जात आहे. स्थानिकीकरणामुळे भारतीय यूजर्ससाठी ChatGPT अधिक संबंधित आणि वापरण्यास सोपे होईल अशी अपेक्षा आहे.
रिपोर्ट्सनुसार, OpenAI लवकरच ChatGPT Go नावाने एक बजेट फ्रेंडली प्लॅन घेऊन येणार आहे, ज्याची किंमत 399 रुपये प्रति महिना असू शकते. हा प्लॅन विद्यार्थी, कॅज्युअल युजर्स आणि पहिल्यांदा AI चा वापर करणाऱ्या युजर्सना टार्गेट करणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या भारत भेटीदरम्यान स्थानिक किंमतीची मागणी करण्यात आली होती. स्टार्टअप संस्थापक आणि विकासकांनी डॉलरमध्ये पेमेंट स्वीकारण्यात अडचणी व्यक्त केल्या होत्या. भारतीय युजर्सच्या या समस्या लक्षात घेऊन OpenAI त्यांच्या ChatGPT युजर्ससाठी या नव्या किंमती घेऊन आला आहे. OpenAI चे VP ऑफ इंजीनियरिंग श्रीनिवास नारायणन यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, कंपनी भारतात त्यांचं टूल्स अधिक स्वस्त बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
भारत, अमेरिकेनंतर OpenAI चा दुसरा मोठा मार्केट बनला आहे. सॅम ऑल्टमन यांचा असं मानणं आहे की, लवकरच भारत अमेरिकेला मागे टाकू शकतो. परप्लेक्सिटी एआयने भारती एअरटेलच्या 36 कोटी ग्राहकांना एक वर्षाचे मोफत प्रीमियम सबस्क्रिप्शन देऊ केले आहे, तर गुगल भारतीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक वर्षाचे मोफत एआय टूल्स देत आहे.