Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किराणा मालाच्या दुकानापासून ते ‘विको’ ब्रँडच्या मालकीपर्यंतचा प्रवास; गोष्ट केशव पेंढारकरांची

केशव विष्णू पेंढारकर हे भारतीय व्यापार क्षेत्रातील खूप मोठे नाव असून त्यांचा जीवन प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विकोचे मालक केशव पेंढारकर यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हे लेख पूर्ण नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 07, 2024 | 06:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जर यश मिळवायचे हवे तर कष्टावाचून पर्याय नाही. एका क्षेत्रात कष्ट करूनही यश मिळाले नाही तर कदाचित तुमच्या कष्ट करण्याच्या पद्धतीत चूक होत असेल किंवा तुम्ही चुकीच्या ठिकाणी कष्ट करत आहात. योग्य कष्ट करण्याची पद्धत आणि योग्य ठिकाण आपल्याला यशाच्या पायरीशी आणून सोडते. जर यशप्राप्ती नक्की कशी केली जाते? याबद्दल जाणून घ्यायचे आहे तर अनेक यशस्वी व्यक्तींविषयी अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यापैकीच एक आहेत केशव विष्णू पेंढारकर!
विष्णू इंडरस्ट्रीअल केमिकल कंपनी (VICCO)चे मालक म्हणून त्यांची ओळख आहे. एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म घेत हजारो-कोटींची कंपनी उभी करण्यामागचा केशव पेंढारकर यांचा प्रवास खूप खडतर होता. या प्रवासात अनेकदा ते पडले,परंतु त्यांच्या प्रत्येक पडण्यातून ते सावरायला शिकले आणि विकोचे विशाल साम्राज्य उभे केले.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे केशव पेंढारकर मराठी भाषिक असून त्यांचा जन्म नागपूरमध्ये एका लोअर मिडल क्लास कुटुंबात झाला. विशेष म्हणजे घरी हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच कमवण्याच्या वाटेवर यावे लागले. त्यांनी कुणाची गुलामी न पत्कारता, घरीच स्वतःचे किराणा मालकाचे दुकान सुरु केले. परंतु, यात काही जास्त यश मिळाला नाही म्हणून ते मायानगरी मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत त्यांनी व्यापाराचे सगळे कौशल्य अवगत केले. व्यापाराच्या कठोर अभ्यासानंतर स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निश्चय केला. पॉन्ड्स, नीविया, अफगान स्नोसारख्या कॉस्मेटिक कंपनीचा आदर्श घेऊन राहत्या घरीच विष्णू इंडरस्ट्रीअल केमिकल कंपनीची सुरुवात केली.

पेंढारकरांनी स्वयंपाक घराला मॅन्युफॅक्चरिंग युनिट बनवला आणि संपूर्ण घराला विकोचा गोदाम! अशा प्रकारे लोकांना भारतीय प्राचीन आयुर्वेद पद्धतीने कॉस्मेटिक वस्तू बनवून देण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. १९५५ साली, विकोचा वार्षिक टर्नओवर तब्बल १० लाख इतका झाला. सुरुवातीला प्रत्येकाच्या दारी जाऊन विकावा लागलेला ‘विको’ आज भारतातील प्रत्येक घरात पोहचलेला आहे.

Web Title: Success story of vicco brand owner keshav pendharkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 06:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.