रतन टाटांचा एक निर्णय... चीनला देखील फुटला घाम; चीनची मक्तेदारी मोडीत काढणार!
टाटा समूहाच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर आता भारत-चीन सीमेजवळ सेमीकंडक्टरच्या प्लांटचे भूमीपूजन झाले आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनचे वर्चस्व मोडण्यासाठी भारतीय उद्योगपती रतन टाटा हा प्लांट उभारणार आहे. रतन टाटा यांच्या या पावलामुळे चीनची पूरती झोप उडाली आहे.
27,000 कोटी रुपयांचा असेल प्रकल्प
भारत-चीनच्या सीमेजवळ टाटा समूहाने 27,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. रतन टाटा यांच्या टाटा कंपनीच्या या पावलामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनची असलेली मक्तेदारी संपणार आहे. टाटा सन्स लिमिटेडचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात 27000 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग आणि टेस्टिंग प्लॅन्टची सुरुवात केली. या प्रकल्पातून रोज 4.83 कोटी चिप तयार होणार आहेत.
हेही वाचा : गौतम अदानींनंतर कोण सांभाळणार अदानी समूहाचा गाडा; ठरलेत ‘हे’ चार वारसदार!
चीनचे वर्चस्व संपुष्टात येणार
टाटा समूहच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर सेमीकंडक्टरचा प्लांटचे आता भूमीपूजन झाले आहे. चीन सीमेजवळ टाटा यांचा हा प्रकल्प सुरु होत आहे. यामुळे चीनमधील सिट्टीपिट्टीचे सेमीकंडक्टर क्षेत्रात असणारे वर्चस्व संपणार आहे. सध्या सेमीकंडक्टर बनवणारा चीन जगातील सर्वात मोठा देश आहे. सेमीकंडक्टरचा वापर कार, मोबाइलसह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणात केला जातो.
दररोज 4.83 कोटी चिपची निर्मिती
टाटा समुहाने या प्रकल्पासाठी आसाम सरकारसोबत 60 वर्षांचा करार करण्यात आला आहे. 27,000 हजार कोटींची गुंतवणूक करुन, रोज 4.83 कोटी चिपची निर्मिती करण्यात येणार आहे. चिप निर्मितीच्या या प्रकल्पामुळे भारत सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होणार आहे. भारताच्या या आत्मनिर्भरतेमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. कारण या क्षेत्रातील चीनचा दबदबा संपणार आहे.