फोटो सौजन्य - Social Media
जेव्हा तुम्ही या ताईंना बघाल तेव्हा त्यांचा साधेपणा पाहून वाटणारही नाही कि यांनी एका मोठ्या कंपनीची निर्मिती केली आहे. मुळात, यांच्या कामगिरीमुळे अनेक स्थानिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. आपल्या कुटुंबाला आधार देत त्यांनी अनेकांच्या कुटुंबाला आधार दिला आहे. विचारसरणी असावी कशी? तर या ताईंकडून शिकून घ्या. या ताईंचे नाव अनिता देवी अशी आहे. त्यांनी एका तेलाच्या कंपनीची सुरुवात केली आहे. मुळात, या दरम्यान यांना फार मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागला. अनिता देवी यांनी लग्नानंतर अनेक गोष्टींचा सामना केला. तेव्हा त्यांनाही काही तरी हटके करण्याचा निर्धार केला. आणि मनामध्ये जे ठरवले ते त्यांनी करूनदेखील दाखवले.
अनिता देवी यांना हा व्यवसाय उभा करण्यात त्यांच्या पतीनेदेखील फार मदत केली. अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी यांना साथ दिली. आज अनिता देवी यांच्या कंपनीमध्ये १० ते १२ लोकं काम करत आहेत. तसेच यांना त्यांचा कामाचा योग्य मोबदला दिला जात आहे. स्थानिक लोकांसाठी अनिता देवी यांनी उत्तम कामाच्या संध्या निर्माण केल्या. मुळात, अनिता देवी या ५० ते ६० लाख रुपयांचा वार्षिक टर्नओव्हर या कंपनीतून काढत आहेत. अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. अनिता देवी यांची तेल घाण्याची कंपनी आता शिखराच्या टोकावर जाण्याचे दिशेने आहे.
अनिता कुमारी यांचे म्हणणे आहे कि जर स्थानिक बिहार राज्य सरकार त्यांना या व्यवसायात काही मदत करू शकेल तर नक्कीच यांना या व्यवसायाला आणखीन वाढवण्यास मदत होईल. त्यांनी त्यांचे लक्ष्यही मांडले आहे. त्यांची अशी इच्छा आहे कि यांना यंदाच्या वर्षात किमान वार्षिक टर्नओव्हर २ कोटींचा तयार करायचा आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तसेच राज्य सरकारने यांना मदत केली तर हे साध्य करणे अधिक सोपे असल्याचे त्यांचे सांगणे आहे. ते म्हणतात कि याने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संध्यादेखील निर्माण करता येईल. त्यांच्या या यशोगाथेत संघर्ष आणि सफलता यांचे उत्तम ताळमेळ आहे. त्यांची ही कथा अनेक गृहिणींसाठी तसेच स्त्रियांसाठी आदर्शाची बाब तर आहेच तसेच अनिता देवी पुरुषांसाठीही एक प्रेरणेचे स्तोत्र आहे.