45 दिवसांपेक्षा कमी एक्सपायरी डेट असलेल्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी; FSSAI चे आदेश जारी
अन्न सुरक्षा नियामक एफएसएसएआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने परवानाधारक अन्न उत्पादक आणि आयातदारांना त्यांच्या FOSCOS (ऑनलाइन अनुपालन प्रणाली) द्वारे नाकारलेल्या आणि कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांचा पुन्हा वापर टाळण्यासाठी त्रैमासिक डेटा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश 16 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता आणि तो रिपॅकर्स आणि रिलीव्हलर्सनाही लागू होणार आहे.
या अहवालात तीन महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अंतर्गत गुणवत्ता चाचणी किंवा तपासणी अयशस्वी झालेल्या उत्पादनांचे प्रमाण, अन्न पुरवठा साखळीतून नाकारलेल्या उत्पादनांचे प्रमाण आणि उत्पादनाची विल्हेवाट यावरील तपशीलवार अहवाल समाविष्ट असणार आहे.
5 दिवसांत गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी बुडाले; वाचा… वर्षाअखेर कसा राहील शेअर बाजाराचा मुड!
काय आहे ऑर्डरचा उद्देश?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या या आदेशाचा उद्देश हा उत्पादनांचा पुनर्वापर आणि पुनर्ब्रँडिंग रोखणे हा आहे. FOSCOS अहवाल कार्य अद्याप विकसित केले जात आहे. नियामकाने अन्न व्यवसायांना सिस्टम कार्यान्वित झाल्यावर सादर करण्याची तयारी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक डेटा गोळा करण्यास सांगितले आहे.
‘या’ आयपीओच्या जीएमपीची कमाल; लिस्टिंगच्या दिवशीच होणार तुमचे पैसे दुप्पट!
वितरणावर असेल बंदी
अलीकडेच, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने आपल्या एका आदेशात अशा वस्तूंच्या वितरणावर बंदी घालण्यास सांगितले होते ज्यांची एक्सपायरी डेट ४५ दिवसांपेक्षा कमी आहे. एफएसएसएआयने ऑनलाइन काम करणाऱ्या सर्व फूड बिझनेस ऑपरेटर्सना ही सूचना दिली होती. या आदेशात FSSAI ने म्हटले आहे की, एफबीओने फक्त तेच खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवावे, ज्यांची एक्सपायरी डेट त्या वेळी किमान 45 दिवस शिल्लक असणार आहे.
तक्रारीचे निराकरण ऑनलाइन केले जाईल
अनेक ग्राहकांच्या तक्रारी पाहता आता ग्राहक व्यवहार मंत्रालय पुढे आले आहे. ग्राहकांच्या समस्यांचे वेळेवर निराकरण करण्यासाठी मंत्रालय 24 डिसेंबर रोजी ई-जागृती ॲप लाँन्च करू शकते. या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर बोलूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना तक्रार करणे सोपे जाणार आहे.