Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेवानिवृत्ती नियोजन सुरू करण्‍याची हीच सर्वोत्तम वेळ; एचडीएफसी लाइफच्या नवीन मोहिमेचे अनावरण

एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्‍या विमा कंपनीने वेळेवर सेवानिवृत्ती नियोजनासाठी महत्वपूर्ण गरजेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन मोहिमेचे अनावरण केले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 02, 2024 | 05:53 PM
सेवानिवृत्ती नियोजन सुरू करण्‍याची हीच सर्वोत्तम वेळ; एचडीएफसी लाइफच्या नवीन मोहिमेचे अनावरण

सेवानिवृत्ती नियोजन सुरू करण्‍याची हीच सर्वोत्तम वेळ; एचडीएफसी लाइफच्या नवीन मोहिमेचे अनावरण

Follow Us
Close
Follow Us:

एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्‍या विमा कंपनीने वेळेवर सेवानिवृत्ती नियोजनासाठी महत्वपूर्ण गरजेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन मोहिमेचे अनावरण केले आहे. भारतातील वृद्ध व्‍यक्‍तींची वाढती लोकसंख्‍या, तसेच आरोग्‍यसेवेमधील सुधारणांमुळे वाढते आयुष्‍य आणि जीवनाचा सुधारित दर्जा यामुळे सेवानिवृत्ती नियोजन करणे अनिवार्य आहे.

२०५० पर्यंत व्‍यक्‍तींना निवृत्तीनंतर ३० वर्षांपर्यंत उत्‍पन्‍नाची गरज भासण्‍याची अपेक्षा असल्‍यामुळे लवकर व धोरणात्‍मक सेवानिवृत्ती नियोजन आवश्‍यक आहे. लवकर सुरूवात करण्‍याचे महत्त्व माहित असताना देखील अनेक भारतीयांना उद्देश व कृतीदरम्‍यान मोठ्या तफावतीचा सामना करावा लागतो. लक्षणीय बाब म्‍हणजे, ५० वर्षांवरील ९० टक्‍के व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या सेवानिवृत्ती नियोजनाला विलंब केल्‍याचा खेद वाटतो.

एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम सेवानिवृत्ती नियोजन पुढे जाण्‍यास कारणीभूत सामान्‍य अडथळ्यावर प्रकाश टाकते. पालक त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या सेवानिवृत्ती नियोजनापेक्षा सामान्‍यत: गृहकर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण किंवा त्वरित कौटुंबिक गरजा अशा आर्थिक कटिबद्धतांना प्राधान्‍य देतात. अशा विलंबामुळे सेवानिवृत्ती निधी कमी होतो, कारण नियोजनाला उशीर झाल्‍याने संपत्ती जमा होण्‍यासाठी मर्यादित वेळ मिळतो.

ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांची उसळी; खरेदीसाठी तुटून पडलेत गुंतवणूकदार!

एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम मुलाचे कॉलेज शिक्षण या संबंधित टप्‍प्‍याचे पालकांसाठी त्‍यांचा सेवानिवृत्ती नियोजन प्रवास सुरू करण्‍याचा महत्त्वपूर्ण क्षण मानते. मोहिमेचा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्‍यासोबत व्‍यक्‍तीचे आर्थिक भविष्‍य सुरक्षित करण्‍याच्‍या गरजेबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.

या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त एचडीएफसी लाइफचे ग्रुप हेड स्‍ट्रॅटेजी आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर विशाल सुभरवाल म्‍हणाले आहे की, ”बचत संपण्‍याचा धोका मोठी समस्‍या आहे, जी व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या जीवनकाळादरम्‍यान सामना करावी लागते. चक्रवाढीच्‍या क्षमतेचा फायदा घेण्‍यासाठी लवकर सेवानिवृत्ती नियोजन सुरू करणे आवश्‍यक आहे.

दक्षिण आशियामधील लिओ बर्नेटचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर विक्रम पांडे म्‍हणाले आहे की, ”अनेकदा वयाच्‍या पन्‍नाशीपर्यंत पोहोचल्‍यावर व्‍यक्‍तींना जाणीव होते की, त्‍यांनी त्‍यांच्‍या निवृत्तीनंतरच्‍या जीवनासाठी पुरेसे नियोजन केलेले नाही आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. एचडीएफसी लाइफसाठी या कॅम्‍पेनमध्‍ये जीवनातील नव्‍या टप्‍प्‍याकडे वाटचाल करणाऱ्या जोडप्‍याच्‍या गाथेला दाखवण्‍यात आले आहे, जेथे त्‍यांच्‍याकडे कोणतीच बचत नाही.

मोहिम अधिक पोहोच व प्रभाव निर्माण करण्‍याच्‍या खात्रीसाठी विविध प्‍लॅटफॉर्म्‍ससह टेलिव्हिजन, डिजिटल आणि इतर मास मीडियावर लाँच करण्‍यात आली आहे. एचडीएफसी लाइफ आर्थिक साक्षरता व जागरूकतेला समर्थन करत आहे, तसेच आजच्‍या डायनॅमिक आर्थिक लँडस्‍केपमध्‍ये सक्रिय सेवानिवृत्ती नियोजनाच्‍या महत्त्वावर भर देत आहे.

Web Title: This is the best time to start retirement planning hdfc life unveils new campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 05:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.