फोटो सौजन्य: iStock
आज देशातील अनेक गुंतवणूकदार विशेषकरून तरुण वर्ग शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसतात. यातही SENSEX मधील टॉपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांचा कल जास्त असतो. काही वेळेस या टॉपच्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक खूपच फायदेशीर ठरते. आज आपण सेन्सेक्स मधील टॉप 10 व्हॅल्युएबल कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅपिटल एकूण 1,18,151.75 कोटी रुपयांनी वाढले. यापैकी एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात, बीएसई बेंचमार्क 354.23 अंकांनी किंवा 0.45 टक्के वधारला, तर निफ्टी 77.8 अंकांनी किंवा 0.33 टक्के वधारला.
या दहा कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि बजाज फायनान्सचे शेअर्स वाढले, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचे मार्केट कॅप घसरले. या चार कंपन्यांना एकूण 1.15 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
दिल्लीत फुललेलं कमळ शेअर बाजारात ‘अच्छे दिन’ आणणार का? जाणून घ्या एक्सपर्टसचे म्हणणे
गेल्या आठवड्यात, HDFC चे मार्केट कॅप 32,639.98 कोटी रुपयांनी वाढून 13,25,090.58 कोटी रुपये झाले, तर भारती एअरटेलने त्यांच्या मार्केट कॅपमध्ये 31,003.44 रुपयांची भर घातली, ज्यामुळे त्यांचे व्हॅल्युएशन 9,56,205.34 कोटी रुपये झाले. त्याचप्रमाणे, बजाज फायनान्सचे मार्केट कॅपिटल 29,032.08 कोटी रुपयांनी वाढून 5,24,312.82 कोटी रुपये झाले आणि इन्फोसिसचे मार्केट कॅपिटल 21,114.32 कोटी रुपयांनी वाढून 7,90,074.08 कोटी रुपये झाले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल 2,977.12 कोटी रुपयांनी वाढून 17,14,348.66 कोटी रुपये झाले आणि आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 1,384.81 कोटी रुपयांनी वाढून 8,87,632.56 कोटी रुपये झाले. याउलट, आयटीसीचे व्हॅल्युएशन 39,474.45 कोटी रुपयांनी घसरून 5,39,129.60 कोटी रुपये झाले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवलही 33,704.89 कोटी रुपयांनी घसरून 5,55,361.14 कोटी रुपयांवर आले.
स्टार्टअपच्या वातावरणात सुरु करा तुमचा Business; आधी ‘या’ टिप्स करा फॉलो
या यादीत स्टेट बँक ऑफ इंडियाचाही समावेश आहे, ज्यांचे मार्केट कॅप 25,926.02 कोटी रुपयांनी घसरून 6,57,789.12 कोटी रुपये झाले आणि टीसीएसचे मार्केट कॅप 16,064.31 कोटी रुपयांनी घसरून 14,57,854.09 कोटी रुपये झाले.
देशांतर्गत कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला आहे. यानंतर, यादीत टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी आणि बजाज फायनान्स यांचा समावेश आहे.