सेन्सेक्समधील टॉप कंपन्यांमध्ये तेजी, ६ कंपन्यांचे मूल्य १.६२ लाख कोटींनी वाढले; एअरटेल-एचडीएफसी टॉप गेनर (फोटो सौजन्य - Pinterest)
Market Cap Marathi News: गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे बाजार भांडवल एकूण १,६२,२८८.०६ कोटी रुपयांनी वाढले. भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक वाढले. गेल्या आठवड्यात, ३० शेअर्स असलेल्या बीएसई सेन्सेक्समध्ये १,२८९.५७ अंक किंवा १.५८ टक्के वाढ झाली.
आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि इन्फोसिसचे बाजार भांडवल वाढले. दुसरीकडे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एलआयसी, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवलात घसरण झाली. या कालावधीत, बीएसई सेन्सेक्स १,२८९.५७ अंकांनी किंवा १.५८% च्या वाढीसह बंद झाला.
पुढील आठवड्यात शेयर बाजार तेजीसह उघडण्याची अपेक्षा आहे. मागील आठवड्यात ज्या कंपन्यांनी बाजारात चांगली आर्थिक कामगिरी केली आणि ज्या कंपन्यांच्या मार्केट कॅप मध्ये वाढ झाली आहे, त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळू शकतात. सोमवारी बाजार उघडल्या नंतर या शेअर्स वर गुंतवणूकदारांची नजर असेल. गुंतवणूक करण्यापूर्वी मागील आठवड्यात कोणत्या कंपनीला किती नफा झाला हे पाहण महत्वाच ठरेल.
भारती एअरटेलचे मार्केट कॅप सर्वाधिक ५४,०५५.९६ कोटी रुपयांनी वाढून ११.०४ लाख कोटी रुपयांवर गेले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ५०,०७०.१४ कोटी रुपयांनी वाढून १९.८२ लाख कोटी रुपये झाले.
एचडीएफसी बँकेलाही ३८,५०३.९१ कोटी रुपयांची वाढ झाली आणि तिचे मार्केट कॅप १५.०७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
इन्फोसिसने ८,४३३.०६ कोटी रुपयांची भर घालून कंपनीचे मार्केट कॅप ६.७३ लाख कोटी रुपयांवर नेले.
आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप ८,०१२.१३ कोटी रुपयांनी वाढून १०.१८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजारमूल्य 3,212.86 कोटी रुपयांनी वाढून 7.10 लाख कोटी रुपये झाले.
बजाज फायनान्सचे मार्केट कॅप १७,८७६.४२ कोटी रुपयांनी घसरून ५.६२ लाख कोटी रुपयांवर आले.
टीसीएसला ४,६१३.०६ कोटी रुपयांचा तोटा झाला आणि त्याचे मूल्यांकन १२.४२ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले.
हिंदुस्तान युनिलिव्हरचे मार्केट कॅप ३,३३६.४२ कोटी रुपयांनी घसरून ५.४१ लाख कोटी रुपयांवर आले.
एलआयसीचे मार्केट कॅप १,१०६.८८ कोटी रुपयांनी घसरून ५.९२ लाख कोटी रुपयांवर आले.
1. रिलायन्स इंडस्ट्रीज
2. एचडीएफसी बँक
3. टीसीएस
4. भारती एअरटेल
5. आयसीआयसीआय बँक
6. स्टेट बँक ऑफ इंडिया
7. इन्फोसिस
8. एलआयसी
9. बजाज फायनान्स
10. हिंदुस्तान युनिलिव्हर