बाजारात येणार नवा आयपीओ (फोटो- istockphoto)
मुंबई: सेफ एंटरप्रायझेस रिटेल फिक्स्चर्स लिमिटेड, जी रिटेल स्टोअर्ससाठी शॉप फिटिंग आणि फिक्स्चरच्या डिझाईन, उत्पादन व इन्स्टॉलेशनच्या क्षेत्रात कार्यरत आहे, हिने NSE Emerge प्लॅटफॉर्मवर तिच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) ची घोषणा केली आहे.
हा IPO २० जून २०२५ रोजी खुलेल आणि २४ जून २०२५ रोजी बंद होईल. यासाठी किंमत श्रेणी ₹१३१ ते ₹१३८ प्रति इक्विटी शेअर अशी निश्चित करण्यात आली असून प्रत्येक शेअरचा फेस व्हॅल्यू ₹५ आहे.
हा पूर्णपणे फ्रेश इश्यू असून यात एकूण १,२३,००,००० इक्विटी शेअर्स जारी केले जातील आणि ₹१६,९७४ लाख उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या इश्यूचे व्यवस्थापन हेम सिक्युरिटीज लिमिटेड करणार असून रजिस्ट्रार म्हणून माशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड काम पाहणार आहे.
किमान अर्ज लॉट १,००० शेअर्सचा आहे. एकूण शेअर्सचे वितरण पुढीलप्रमाणे आहे
QIB साठी: ५८,३७,००० शेअर्स
NII साठी: १७,५२,००० शेअर्स
RII साठी: ४०,८७,००० शेअर्स
मार्केट मेकरसाठी: ६,२४,००० शेअर्स
उभारण्यात येणाऱ्या भांडवलाचा वापर पुढील हेतूंसाठी केला जाणार आहे
ठाण्यात एकात्मिक उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी ₹६,५८८.५९ लाख
सहाय्यक कंपनी Safe Enterprises Retail Technologies Private Limited मध्ये ₹६९९.०२ लाख गुंतवणूक
कंपनी व तिच्या सहाय्यक कंपनीसाठी कार्यकारी भांडवल आवश्यकतेसाठी अनुक्रमे ₹३,००० लाख व ₹१,००० लाख
सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतूंसाठी
कंपनी परिचय
सेफ एंटरप्रायझेसची स्थापना १९७६ मध्ये भागीदारी फर्म म्हणून झाली होती. जुलै २०२४ मध्ये ती पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आणि नाव झाले Safe Enterprises Retail Fixtures Limited. कंपनीच्या दोन सहाय्यक संस्था आहेत – Safe Enterprises Retail Technologies Private Limited आणि Inscite Advisory Services LLP.
कंपनीचे मुख्यालय नवी मुंबई येथे आहे आणि तिचे तीन उत्पादन प्रकल्प तिथेच आहेत. कोच्ची येथे एक एक्सपीरियन्स सेंटरही चालते. कंपनी विविध रिटेल सेगमेंटसाठी कस्टमाईझ्ड व तंत्रज्ञान आधारित फिक्स्चर सोल्युशन्स प्रदान करते.
आर्थिक कामगिरी
FY25 एकूण महसूल ₹१३,८३१.३१ लाख
EBITDA ₹५,२१०.६५ लाख (३७.६७%)
निव्वळ नफा ₹३,९१८.५४ लाख (२८.३३%)
ROE: ७७.५४%
ROCE: ६९.१०%
FY23–FY25 महसूल CAGR: ३३.८४%
FY23–FY25 PAT CAGR: ८०.०४%
व्यवस्थापन
श्सलीम शब्बीर मर्चंट – चेअरमन व एमडी (४८ वर्षांचा अनुभव)
मिकदाद मर्चंट – पूर्णवेळ संचालक व सीएफओ (१३ वर्षांचा अनुभव)
हुजेफा मर्चंट – पूर्णवेळ संचालक (१४ वर्षांचा अनुभव)