Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ शहरात उभारला जाणार भारतातील सर्वात मोठा मॉल; तब्बल 3000 जणांना मिळणार नोकरी!

संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमधील लुलू ग्रुप हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल बनवणार आहे. यासाठी लुलू इंटरनॅशनलला गुजरातमधील अहमदाबादमध्ये जमीन देखील मिळाली आहे. या मॉलच्या उभारणीसाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. युसूफ अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मॉल 3,50,000 स्क्वेअर फुटांवर बांधण्यात येणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 09, 2024 | 07:38 PM
'या' शहरात उभारला जाणार भारतातील सर्वात मोठा मॉल; तब्बल 3000 जणांना मिळणार नोकरी!

'या' शहरात उभारला जाणार भारतातील सर्वात मोठा मॉल; तब्बल 3000 जणांना मिळणार नोकरी!

Follow Us
Close
Follow Us:

युएईचा लुलु ग्रुप भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल उभारणार आहे. एएनआय याबाबत दिलेल्या वृत्तांनुसार, लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ अली भारतातील सर्वात मोठ्या मॉलच्या बांधकामाबाबत खूपच उत्साहित आहेत. भारतातील गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, आपल्या स्थानिक सहकारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देताना मला खूप आनंद होत आहे. याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून या संदर्भात पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

चालू वर्षापासून होणार बांधकाम सुरु

चालू वर्षापासून या लुलु ग्रुपच्या भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मॉलचे बांधकाम सुरू होणार आहे. याशिवाय लुलु ग्रुपचा देखील हा आतापर्यंतच्या सर्वात मोठा मॉल असणार आहे. असेही लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ अली यांनी सांगितले आहे. दरम्यान, लुलू ग्रुपमध्ये एकूण 65,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांचा व्यवसाय 42 देशांमध्ये पसरलेला आहे. समूहाची उलाढाल सुमारे 8 अब्ज डॉलर इतकी आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – 20,000 कोटींचा मालक! कधीकाळी मुंबईतील झोपडपट्टीत राहिला; उदरनिर्वाहासाठी पुस्तके, राख्या विकल्या!

स्थानिक 3,000 मुला-मुलींना रोजगार मिळणार

लुलु ग्रुपच्या भारतातील या सर्वात मोठ्या मॉलच्या बांधकामामुळे, भारतातील स्थानिक 3,000 मुला-मुलींना रोजगार मिळणार आहे. अशा स्थितीत आपल्या स्थानिक सहकारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने आपल्याला आनंद होत आहे. असेही लुलू ग्रुप इंटरनॅशनलचे सीएमडी एमए युसूफ यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा – तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलने घेतलाय हा महत्वाचा निर्णय

‘या’ शहरांमध्ये आहेत लुलू ग्रुपचे मॉल

दरम्यान, युएईच्या लुलु ग्रुपचे देशातील अनेक शहरांमध्ये मॉल्स आहेत. यामध्ये बेंगळुरू, कोईम्बतूर, हैदराबाद, कोची, लखनऊ आणि तिरुवनंतपुरम या शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका मुलाखतीदरम्यान लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ यांनी माहिती दिली होती की, ते अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये देशातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल बनवणार आहेत. त्यानंतर आता त्यांनी आता पुन्हा एकदा लुलु ग्रुपचा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल चालू वर्षीपासून उभारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Uae lulu group to build biggest mall in india ahmedabad will create 3000 jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 07:38 PM

Topics:  

  • Ahmedabad

संबंधित बातम्या

India Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यानी स्पष्टच सांगितले…
1

India Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यानी स्पष्टच सांगितले…

Shocking News : बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी
2

Shocking News : बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाने पीडितेच्या ब्रिटिश कुटुंबियांना १२ चुकीचे मृतदेह सोपवले, तपासात मोठा खुलासा
3

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाने पीडितेच्या ब्रिटिश कुटुंबियांना १२ चुकीचे मृतदेह सोपवले, तपासात मोठा खुलासा

Ahmedabad Mass Suicide: अहमदाबादेत बुराडी सामुहिक आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य
4

Ahmedabad Mass Suicide: अहमदाबादेत बुराडी सामुहिक आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.