20,000 कोटींचा मालक! कधीकाळी मुंबईतील झोपडपट्टीत राहिला; उदरनिर्वाहासाठी पुस्तके, राख्या विकल्या!
युएईमधील दुबई हे शहर लक्झरी लाइफसाठी ओळखले जाते. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबईमध्ये आहे. सध्या मालमत्ता खरेदीच्या बाबतीत दुबई हे जगातील सर्वात टॉप शहर आहे. अनेक भारतीय दुबईत राहतात. त्यापैकी एक म्हणजे रिझवान साजन हे देखील आहे. ते आज दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय आहे. मुंबईत वाढलेल्या रिझवानसाठी इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. मेहनतीच्या जोरावर तो या पदापर्यंत पोहोचला आहे.
20 हजार कोटींहून अधिक संपत्तीचा मालक
रिझवान हे डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. बांधकाम, गृह सजावट आणि रिअल इस्टेटच्या व्यवसायात गुंतलेला त्यांचा काम करतो. त्यांच्या समूहाच्या शाखा युएई, ओमान, सौदी अरेबिया, कतार, भारत इत्यादी देशांमध्ये पसरलेल्या आहेत. एकेकाळी सेल्समन म्हणून काम करणारा रिझवान आज 20 हजार कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे. फोर्ब्स यादीनुसार, त्यांच्या व्यवसायाची एकूण वार्षिक उलाढाल ही 2 अब्ज डॉलर्स (सुमारे 17 हजार कोटी रुपये) इतकी आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
काढलेत हालाखीचे दिवस
रिजवानचा जन्म मुंबईतील घाटकोपर येथील झोपडपट्टीत झाला. त्यांचे बालपणही मुंबईच्या या झोपडपट्ट्यांमध्ये गेले. रिजवानने फोर्ब्सला दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांना लॉटरी लागली. यानंतर त्याचे कुटूंब एका छोट्या चाळ वजा घरात शिफ्ट झाले. त्यावेळी रिजवान हा आपल्या बहिणीसोबत अनेक किलोमीटर चालत शाळेत जायचा. त्याला शाळेच्या कॅन्टीनमधून काहीही विकत घेण्याइतके पैसे घरून मिळत नव्हते. त्याच क्षणी त्याने पैसे कमवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा चंग मनी बांधला.
16 व्या वर्षी वडिलांचे निधन
रिझवानने वडिलांकडून एक हजार रुपये उसने घेतले होते. त्याने काही पुस्तके मोठ्या प्रमाणात खरेदी केली आणि ती आपल्या मित्राला बाजारभावाने विकली. यातून त्याला काही पैसे मिळाले. यानंतर त्याने काही काळ दूध विक्रीही केली. त्यानंतर त्याने हंगामी व्यवसाय प्रामुख्याने राख्या, फटाके वगैरे देखील विकले. तो 16 वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. त्यामुळे रिझवानला शिक्षण सोडावे लागले.
1993 मध्ये केली व्यापारी संस्था स्थापन
वडिलांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन वर्षांनी, त्याच्या काकांनी कुवेतमध्ये नोकरी करण्याचा सल्ला दिला. मुंबईत असताना तो महिन्याला 6 हजार रुपये कमवत होता, तर त्याला कुवेतमध्ये नोकरी मिळताच त्याला 150 दिनार (त्यावेळी सुमारे 18 हजार रुपये) इतका पगार मिळाला होता. रिझवान म्हणतो की, हे त्याच्यासाठी लॉटरी खेळल्यासारखे होते. त्याने कुवेतमध्ये काम करणे सुरु केले. त्या ठिकाणी रिझवानने प्रशिक्षणार्थी सेल्समन म्हणून काम करणे सुरु केले. हळूहळू पद आणि पगार दोन्ही वाढत गेले. 1993 मध्ये त्यांनी एक व्यापारी संस्था स्थापन केली. त्यानंतर मागे आपल्या व्यवसायात मागे वळून पाहिले नाही.
आतापर्यंत २५ हून अधिक निवासी प्रकल्प
फोर्ब्सच्या यादीनुसार, रिझवानने 2014 मध्ये मध्य पूर्वेतील रिअल इस्टेटच्या जगात प्रवेश केला आहे. युएईमध्ये आतापर्यंत २५ हून अधिक निवासी प्रकल्प सुरू केले आहेत. दुबईमध्ये भारतीय ज्या मालमत्ता खरेदी करत आहेत. त्यात रिझवानशी संबंधित प्रकल्पांची संख्या लक्षणीय आहे. दरमहा एक टक्के पेमेंट प्लॅनसह लक्झरी परवडणारी योजना लॉन्च करण्याची रिझवानची योजना आहे.