दी गोदरेज एंटरप्राईजेस ग्रुपच्या वतीने “ब्रिजिंग होरायजन्स फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर” या संकल्पनेसह कॉन्शियस कलेक्टीव्ह’ची दुसरी आवृत्ती लॉंच करण्यात आली. पवन सुखदेव, माधव पै, चन्ना दासवत्ते, काय-उग्वे बर्गमन, केन यिआंग आणि चित्रा विश्वनाथन अशा मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभली.
दिनांक 14 आणि 15 डिसेंबर 2024 दरम्यान सार्वजनिक स्वरुपात खुल्या होणाऱ्या या मंचावर द्रष्टी व्यक्तिमत्त्व सहभागी होती. आर्किटेक्ट, डिझाईन आणि शाश्वतता अशा विषयांभोवती संवाद घडला. वाढते कार्बन उत्सर्जन कसे थांबेल आणि शहरी राहणीमानाशी निगडीत वातावरणाचे नवे चित्र घडविण्यात होणाऱ्या कृतींची चर्चा रंगली.
या प्रसंगी बोलताना, जमशेद गोदरेज, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, गोदरेज एंटरप्राईजेस ग्रुप, म्हणाले, “भारत झपाट्याने आगेकूच करत असून हा एक विकसनशील देश आहे, जिथे व्यवसाय हे अशातऱ्हेने कार्यरत आणि नवोन्मेषक असावेत की सामाजिकदृष्ट्या जबाबदारीचे दर्शन घडले पाहिजे. या मंचासोबत उद्योजक, स्टार्ट-अपशी भागीदारी तसेच त्यांचे सबलीकरण आणि ग्राहकांकरिता नवीन सजग शक्यता खुल्या होतील अशी आम्हाला आशा वाटते.”
या मंचाची निर्मिती अधिक जागरूक जीवनशैली स्वीकारण्यासाठी सर्व वयोगटातील व्यावसायिक आणि व्यक्तींना सक्षम करण्याकरिता झाली आहे. कार्यक्रमात विचारप्रवर्तक मांडणी, संभाषण, पश्चिम घाटावरील एक गुंतवून ठेवणारा अनुभव, एक सिने-महोत्सव आणि मुलांसाठी सर्जनशील कार्यशाळांचा समावेश होता.
न्यारिका होळकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर, गोदरेज एंटरप्राईजेस ग्रुप, म्हणाल्या, “कॉन्शियस कलेक्टिव्हमागील कल्पना ही समुदाय तयार करण्याची आहे. एक असा समुदाय जो पृथ्वीवरील विपरीत परिणाम कमी करणारे साहित्य तयार करण्याचे आणि वापरण्याचे अधिक चांगले मार्ग दाखवून जागतिक तापमानवाढीच्या तातडीच्या गरजा पूर्ण करणारे उपाय शोधू शकेल. कॉन्शियस कलेक्टिव्ह गुणवत्ता किंवा मूल्याशी तडजोड न करता, आम्ही केलेल्या निवडीमध्ये अधिक विचारशील होण्यासाठी आम्हाला सक्षम करण्यासाठी उत्प्रेरक ठरू शकेल, असे आम्हाला वाटते”.
गोदरेज डिझाईन लॅब शाश्वत डिझाईन, मटेरियल एक्सप्लोरेशन आणि सामाजिक प्रभाव या विषयातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देते आहे. या कार्यक्रमात गोदरेज डिझाईन लॅब 2024 च्या विद्यार्थ्यांच्या कार्याचे प्रदर्शन घडविण्यात आले. तसेच 2025 साठी विद्यार्थ्यांच्या नवीन तुकडीची घोषणाही करण्यात आली. याव्यतिरिक्त, क्रिएटर स्पॉटलाइट अवॉर्ड्सने डिजिटल कंटेंट क्रिएटरना सन्मानित केले. जे दैनंदिन जागरूक जीवन, कचरा व्यवस्थापन, सजग राहणीमानाकरिता कंटेंट तयार करून प्रभाव पाडत आहेत आणि बदल घडवणारे घटक (चेंजमेकर) हे इतरांना अधिक जागरूक पद्धती स्वीकारण्यास प्रेरित करीत आहेत.
जर तुम्ही स्वत: अधिक सजग पद्धतीने तुमचा सजग जीवनप्रवास करण्यासाठी तयार असाल किंवा तुम्ही डिझाईन आणि आर्किटेक्ट क्षेत्रात आवड असणारे असल्यास हा मंच तुमच्याकरिता आहे. मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार्स, रॉ कोलॅबोरेटिव्ह, बारो मार्केट, ब्लू टोकाई, मॅग स्ट्रीट किचन, इकतारा, फूल, ऊर्जा, बानोफी लेदर, कहानी ट्री, पेंग्विन, तारा बुक्स, म्युझियम ऑफ सोल्यूशन्स (म्युसो) हे या आवृत्तीतील काही ब्रँड आहेत.