Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Payment Decline : MDR चार्जेसचा घेतला धसका? लागू होण्यापूर्वीच UPI पेमेंटमध्ये घट! मग 15 ऑक्टोबरपासून काय होणार?

UPI Payment Decline : व्यावसायिक युपीआय (P2M) व्यवहारांवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% MDR लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये UPI व्यवहारांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. ₹२,००० पेक्षा जास्त मूल्याच्या व्यापारी व्यवहारांवर शुल्क लागू होणार असल्याने व्यापारी आणि ग्राहकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 03, 2026 | 02:43 PM
लागू होण्यापूर्वीच UPI पेमेंटमध्ये घट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

लागू होण्यापूर्वीच UPI पेमेंटमध्ये घट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • MDR चार्जेसचा घेतला धसका?
  • लागू होण्यापूर्वीच UPI पेमेंटमध्ये घट!
  • मग 15 ऑक्टोबरपासून काय होणार?
UPI Payment Decline :  देशभरात 15 ऑक्टोबरपासून UPI पेमेंटवर MDR लागू करण्यात येणार आहे. 2000 रुपयांवरील UPI पेमेंट करण्यात येईल त्यावर 0.4 % MDR लागणार आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचा देशभरातील विरोध होत आहे. विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यासाठी २ ऑक्टोबरला आंदोलनही करण्यात येणार होतं पण अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पण असं असलं तरीही या निर्णयाचा परिणाम देशभरात दिसून येत आहे. हे बोलण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे UPI व्यवहारांमध्ये झालेली घट. ( UPI Payment Decline ) 

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता

UPI वरील व्यवहारांच्या संख्येत मोठी घट

भारत सरकारकडून जसा MDR बाबत निर्णय घेण्यात आला तसा युपीआयवरील व्यवहारांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये मोठी घट दिसून आली. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ही घट तब्बल 1.8 टक्के इतकी होती. आकड्यामध्ये दिसताना लहान दिसणारी ही घट मात्र संपूर्ण भारताचा विचार करता फार मोठी आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये युपीआयच्या माध्यमातून 2407 कोटी व्यवहार झाले मात्र हीच संख्या ऑगस्टमध्ये तब्बल 2450 कोटी इतकी होती.

आकडेवारी नेमकी काय?

युपीआय व्यवहारांच्या एकूण मुल्यांचा देखील विचार केला तर सप्टेंबरमध्ये 1.5 टक्क्यांनी घट होऊन 29.37 लाख कोटीं रुपयांवर आले आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हे मुल्य तब्बल 29.82 लाख कोटी रुपयांवर होतं. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेट ऑफ इंडिया NPCI या सगळ्या प्रणालीचं संचालन करते.

यात मोठा ट्विस्ट काय?

या सगळ्यात एक मोठी ट्विस्ट आहे. सप्टेंबरमध्ये व्यवहारांच्या संख्येत जरी मासिक घट दिसत असली तरीही दिवसाला होणाऱ्या सरासरी व्यवहारांमध्ये मात्र वाढ झालेली पाहायला मिळते. ऑगस्टमध्ये 31 दिवस असलेल्या महिन्यांत एकूण व्यवहारांची संख्या तुलनेने अधिक राहिली. मात्र सप्टेंबरमध्ये 30 दिवस असल्यामुळे एकूण व्यवहार कमी दिसत आहे. सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी 80.2 कोटी युपीआय व्यवहार झाले. तर ऑगस्टमध्ये हा आकडा 79.1 कोटी इतका होता. NPCI द्वारे चालविल्या जाणाऱ्या इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस IMPS प्रणालीवर सप्टेंबरमध्ये 35.40 कोटी व्यवहार झाले. या व्यवहारांचे एकूण मुल्य 7.05 लाख कोटी रुपये इतके होते. रिझर्व्ह बँकेच्या रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट RTGS प्रणालीवर सप्टेंबरमध्ये 3.25 कोटी व्यवहार झाले. या व्यवहारांचे एकूण मुल्य 235.71 लाख कोटी रुपये इतकं होते.

जरी आता आकडे अशा प्रकारे समोर येत असले तरीही खरा खेळ 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. MDR बाबत केलेला नियम जैसे थे राहिला तर त्याचा नागरिकांवर आणि व्यावाऱ्यांवर कशा प्रकारे परिणाम होतो हे पाहवं लागेल. कारण या नियमाचा व्यवहारांवर आणि पेमेंट पद्धतीवर परिणाम होणार एवढं मात्र नक्की.

RBI Rules For Bank : बँकांविरोधात वाढताहेत तक्रारी… RBI अँक्शन मोडवर! सिस्टीम सुधारण्याचे दिले कडक आदेश, ग्राहकांना काय फायदा?

Web Title: Upi transactions decline ahead of mdr rule implementation marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • UPI payment

संबंधित बातम्या

अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत असं झालं तरी काय? 2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द!  व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
1

अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत असं झालं तरी काय? 2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द! व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

Apple युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 15 ऑक्टोबरपासून Apple Pay वरही लागणार MDR Charges? UPI पेक्षा कसा वेगळा आहे नियम?
2

Apple युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 15 ऑक्टोबरपासून Apple Pay वरही लागणार MDR Charges? UPI पेक्षा कसा वेगळा आहे नियम?

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
3

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

UPI वर लागणाऱ्या Charges चा गोंधळ Share खरेदीतही! ब्रोकर भरणार की गुंतवणूकदारांच्या खिशाला बसणार फटका?
4

UPI वर लागणाऱ्या Charges चा गोंधळ Share खरेदीतही! ब्रोकर भरणार की गुंतवणूकदारांच्या खिशाला बसणार फटका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.