Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाय-बाय विस्तारा… आज विस्ताराची विमाने शेवटची उड्डाणे भरणार; एअर इंडियात होणार विलिन!

9 जानेवारी 2015 रोजी विस्तारा या विमान वाहतूक कंपनीने दिल्ली आणि मुंबई दरम्यान पहिले उड्डाण सुरु केले होते. मात्र, आता ९ वर्षांच्या वाटचालीनंतर विस्तारा ही कंपनी आपले कामकाज एअर इंडियामध्ये विलिन करणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 11, 2024 | 05:22 PM
बाय-बाय विस्तारा... आज विस्ताराची विमाने शेवटची उड्डाणे भरणार; एअर इंडियात होणार विलिन!

बाय-बाय विस्तारा... आज विस्ताराची विमाने शेवटची उड्डाणे भरणार; एअर इंडियात होणार विलिन!

Follow Us
Close
Follow Us:

देशातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी विस्ताराने सोमवारी (ता.11) शेवटचे उड्डाण भरले आहे. विस्तारा ही विमान वाहतुक कंपनी मंगळवारी (ता.12) एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. 2013 मध्ये टाटा समूहाने सिंगापूर एअरलाइन्ससह संयुक्त उपक्रम करून, पुन्हा विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि 9 जानेवारी 2015 रोजी विस्ताराने दिल्ली आणि मुंबई दरम्यान पहिले उड्डाण सुरु केले होते. मात्र, आता ९ वर्षांच्या वाटचालीनंतर विस्तारा ही कंपनी आपले कामकाज एअर इंडियामध्ये विलिन करणार आहे.

बाजारातील हिस्सा वाढणार

विस्तारा-एअर इंडियाच्या या विलीनीकरणामुळे, एअर इंडिया देशातील पहिली पूर्ण सेवा वाहक बनेल आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील एअर इंडियाचा बाजारपेठेतील हिस्सा 50 टक्क्यांवरून 54 टक्क्यांपर्यंत वाढेल. दरम्यान, 27 टक्के मार्केट शेअरसह एअर इंडिया आधीच आंतरराष्ट्रीय मार्गांवर वर्चस्व गाजवत आहे. त्यामुळे आता विस्तारा-एअर इंडियाच्या विलीनीकरणामुळे त्यात आणखीनच वाढ होणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात काय घडले? कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले; वाचा… सविस्तर!

इंडिगोला आव्हान देण्यासाठी विलीनीकरण

सध्या भारताच्या एव्हिएशन सेक्टरची मार्केट लीडर इंडिगो ही विमान वाहतूक कंपनी आहे. परंतु, एअर इंडिया इंडिगोला आव्हान देण्यासाठी विस्ताराच्या विलीनीकरणाने स्वतःला मजबूत करत आहे. विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर, या दोन्ही कंपन्यांच्या एकूण विमानांची संख्या 144 वरून, 214 विमाने होणार आहे. एअर इंडियाची कमी किमतीची वाहक एअर इंडिया एक्स्प्रेसकडे 90 विमाने आहेत. कंपनीने बोईंग आणि एअरबसकडून 470 नवीन विमानांची मागणी केली आहे, ज्यांची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात इंडिगोला चांगलेच आव्हान मिळणार आहे.

हे देखील वाचा – एशियन पेंट्सचा शेअर 9.50 टक्क्यांनी घसरला, 2020 नंतर स्टॉकने पहिल्यांदा गाठली निच्चांकी पातळी!

विस्ताराने 6.5 कोटी प्रवाशांनी केला प्रवास

विस्तारा आज आपले शेवटची विमाने उडवत आहे. 11 नोव्हेंबर रोजी या ब्रँड नावाखाली कंपनीची शेवटच्या वेळी उड्डाणे होणार आहे, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांसह 50 हून अधिक स्थानांवर कंपनीची उड्डाणे कार्यरत आहे. त्यापैकी विस्ताराची 12 देशांसाठी थेट उड्डाणे आहेत. कंपनीकडे 70 विमाने आहेत. 2015 पासून, 6.5 कोटींहून अधिक प्रवाशांनी विस्ताराच्या माध्यमातून प्रवास केला आहे.

प्रवाशांना सर्वसमावेशक सेवा मिळणार

विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतरही विस्तारा एअरलाइनचे नाव संपणार नाही. विमान कंपनी त्याच नावाने कार्यरत राहील. पण, त्याचा कोड बदलेल. विस्तारा एअरलाईनचा कोड एअर इंडियानुसार असेल. विस्ताराच्या फ्लाइट कोडमध्ये एI2 उपसर्ग म्हणून वापरला जाईल. त्यानुसार विस्ताराच्या २.५ लाख ग्राहकांची तिकिटे एअर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत.

Web Title: Vistara bid adieus with its last flight before merger with air india on 12 november 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 05:22 PM

Topics:  

  • air india

संबंधित बातम्या

आजच्या दिवशीचे झाले होते TATA चे Air India च्या विस्तारासह मर्जर, 1 वर्षात एअर इंडियाची क्रेझ घटली, Data मधून सिद्ध
1

आजच्या दिवशीचे झाले होते TATA चे Air India च्या विस्तारासह मर्जर, 1 वर्षात एअर इंडियाची क्रेझ घटली, Data मधून सिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.