फोटो सौजन्य - Social Media
या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराची दिशा मुख्यतः जागतिक घडामोडी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) क्रियाकलापांवर अवलंबून असेल, कारण देशांतर्गत स्तरावर कोणतेही मोठे आर्थिक संकेतक अपेक्षित नाहीत. २५ डिसेंबर रोजी, बुधवारी, नाताळ असल्यामुळे शेअर बाजार बंद असेल. त्यामुळे या आठवड्यात कमी व्यापार सत्रे असणार आहेत. या आठवड्याबद्दल विश्लेषकांनी काही मत व्यक्त केले आहेत. काही तद्न्य मंडळींनी बाजारा संदर्भात मत जाहीर केले आहेत. येत्या आठवड्यात बाजारात काय घडणार? किंवा कोणत्या दिशेने बाजार जाईल याचा बऱ्यापैकी अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काय आहे विश्लेषकांचे मत? जाणून घ्या
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे प्रवेश गौड यांनी त्यांचे मत जाहीर केले आहे. ते म्हणतात कि, “देशांतर्गत स्तरावर मोठ्या संकेतकांचा अभाव आहे. मात्र, अमेरिकेतील बाँड उत्पन्न, डॉलर निर्देशांकाची कामगिरी, बेरोजगारी दावे आणि नवीन घरांच्या विक्रीचे आकडे हे जागतिक संकेतक बाजाराला दिशा देतील.”
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे वी के विजयकुमार यांनी सांगितले आहे कि, “एफआयआयंचा कल अचानक खरेदीवरून विक्रीकडे वळल्याने बाजारावर परिणाम झाला आहे.” तर बाजाराबाबत रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडच्या अजित मिश्राचे म्हणणे आहे कि “या आठवड्यात कमी व्यापार सत्रे असतील. बाजार सहभागींनी एफआयआयंचा प्रवाह आणि जागतिक बाजारांची कामगिरी यावर लक्ष केंद्रित करावे.” तर सिद्धार्थ खेमका मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेससह जोडलेले असून त्यांनीही त्यांचे मत व्यक्त केले आहे. “भारतीय बाजारात कमजोरी राहण्याची शक्यता आहे. उतार-चढावाच्या दरम्यान, बाजार सहभागींनी जागतिक संकेतकांवर लक्ष ठेवावे. सणासुदीचा हंगाम येत असल्याने आणि जागतिक बाजारात दोन-तीन दिवस सुट्ट्या असल्याने, स्थानिक बाजारातील क्रियाकलाप मंदावू शकतात.”
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आलेली आहे. बीएसई सेन्सेक्स 4,091.53 अंकांनी घसरला आहे, ही घसरण 4.98% इतकी आहे. तर एनएसई निफ्टी 1,180.8 अंकांनी कमी झाला. एकंदरीत, NSE निफ्टीमध्ये 4.76% घसरण झाली आहे. त्यमंजुळें गुंतवणूकदार येत्या आठवड्यासंदर्भांत फार चिंतीत दिसून येत असल्याचे समोर येत आहे. एकंदरीत, या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराची दिशा मुख्यतः जागतिक संकेतक, एफआयआयंची क्रियाकलाप, रुपया-डॉलर विनिमय दर आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असेल. सणासुदीच्या हंगामामुळे आणि जागतिक बाजारातील सुट्ट्यांमुळे स्थानिक बाजारातील क्रियाकलाप मंदावण्याची शक्यता आहे. असे मत अनेक बाजार तज्ज्ञांनी आणि विश्लेषकांनी दिले आहे.