Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हाट्सएपचा नवा उपक्रम; देशातील लघु व्यवसायांना सक्षम करण्याचा निर्धार

व्हाट्सएपने 'व्हाट्सएप भारत यात्रा' उपक्रम सुरू करून लघु व मध्यम व्यवसायांना डिजिटल सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे ग्राहकांशी जोडणी व व्यवसाय वाढवणे शक्य होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 11, 2024 | 06:01 PM
व्हाट्सएपचा नवा उपक्रम; देशातील लघु व्यवसायांना सक्षम करण्याचा निर्धार
Follow Us
Close
Follow Us:

व्हाट्सएपने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एसएमबी) ‘व्हाट्सएप भारत यात्रा’ उपक्रम सुरू केला आहे. डिजिटल सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम लघु व्यवसायांना व्हाट्सएपच्या विविध टूल्सचे प्रशिक्षण देईल. यामध्ये व्यावसायिक संवाद कौशल्ये विकसित करणे, डिजिटल उपस्थिती मजबूत करणे, आणि ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने जोडणी करणे यावर भर दिला जाईल. या टूरची सुरुवात दिल्ली-एनसीआरमधील लोकप्रिय बाजारपेठांपासून झाली आहे, जसे लक्ष्मी नगर, राजौरी गार्डन, आणि नेहरू प्लेस. यानंतर, बस आग्रा, लखनौ, कानपूर, अहमदाबाद, आणि म्हैसूरसारख्या शहरांमध्ये प्रवास करेल.

2024 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्च केल्यात या गोष्टी; वाचा… टॉप 10 बाबींची यादी!

या उपक्रमातून वैयक्तिकृत प्रशिक्षण देणे तसेच डिजिटल कौशल्ये वाढवण्यावर भर दिला जाईल. या उपक्रमाद्वारे लघु व्यवसायांना त्यांच्या व्हाट्सएप बिझनेस प्रोफाइलसाठी कॅटलॉग तयार करणे, जाहिरातींचे व्यवस्थापन करणे, आणि ग्राहकांशी संवाद वाढवणे यासाठी मदत केली जाईल. तसेच, त्यांना जलद प्रतिसाद, अपॉइंटमेंट रिमाइंडर्स, आणि सानुकूल संदेश पाठवण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.

नवीन वैशिष्ट्यांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. तसेच व्हाट्सएपचा वापर आता काही और होणार आहे.
व्हाट्सएपने नुकतेच मेटा वेरिफाइड आणि एआय-सक्षम सेवा सुरू केल्या आहेत, ज्यामुळे व्यवसायांना विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढवता येईल. या यात्रेद्वारे, व्यवसायांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार मार्गदर्शन मिळेल. भारतातील मेटाच्‍या बिझनेस मेसेजिंगचे संचालक रवी गर्ग म्‍हणाले, ”लघु व्‍यवसाय भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचे आधारस्‍तंभ आहेत आणि योग्‍य डिजिटल टूल्‍स मिळाल्‍यास त्‍यांच्‍यामध्‍ये देशाच्‍या डिजिटल परिवर्तनाला गती देण्‍याची क्षमता आहे.व्हाट्सएप भारत यात्रा या व्‍यवसायांना ग्राहकांशी डिजिटली कनेक्‍ट होण्‍यासाठी, विकास करण्‍यासाठी आणि यशस्‍वी होण्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍य व ज्ञान देत त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमता समोर आणण्‍यास मदत करण्‍याप्रती आमची कटिबद्धता आहे. प्रत्‍यक्ष व डिजिटली व्‍यवसायांच्‍या गरजांची पूर्तता करत आमचा भारतातील उद्योजकता क्षेत्रात अर्थपूर्ण, दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.”

मोठी बातमी! नववर्षापासून दाढी-कटिंगचे दर वाढणार, 20 ते 30 टक्क्यांची भाववाढ होणार

व्हाट्सएप भारत यात्रा हा उपक्रम मेटाच्या इतर योजनेचा भाग आहे, ज्यामध्ये इंडिया एसएमई फोरमसह चालवलेल्या ‘डिजिशास्त्र’ उपक्रमाचा समावेश आहे. याशिवाय, मेटाने ओएनडीसीसोबत धोरणात्मक भागीदारी करून लघु व्यवसायांच्या डिजिटल विकासाला प्रोत्साहन दिले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, लघु व्यवसायांना व्हाट्सएप बिझनेस एपची क्षमता ओळखता येईल, तसेच ते ग्राहकांशी जोडले जाऊन त्यांच्या व्यवसायाचे प्रमाण वाढवू शकतील. अशा उपक्रमामुळे भारतातील लघु व्यवसाय डिजिटल अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज होतील. व्हाट्सएपचा हा उपक्रम देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देत, भारतातील उद्योजकतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.

Web Title: Whatsapps new initiative to determined to empower small businesses in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 06:01 PM

Topics:  

  • Business News
  • new whatsapp

संबंधित बातम्या

निटकोतर्फे पहिल्या तिमाहीत ११४ टक्क्यांची वाढ, टाइल्स व्यवसायाचा विकास
1

निटकोतर्फे पहिल्या तिमाहीत ११४ टक्क्यांची वाढ, टाइल्स व्यवसायाचा विकास

Abbott कडून FreeStyle Libre 2 Plus, आता प्रत्येक मिनिटाला मोजता येणार शरीरातील ग्लुकोज
2

Abbott कडून FreeStyle Libre 2 Plus, आता प्रत्येक मिनिटाला मोजता येणार शरीरातील ग्लुकोज

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
3

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद
4

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.