
किरकोळ महागाई ६ टक्क्यांनी वाढली (फोटो सौजन्य - ChatGPT)
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमधील ७.७४ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये अन्नधान्य महागाई ८.९४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ एकाच महिन्यात अन्नधान्य महागाईत मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्याच्या किमतीतील वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या खिशावर होत आहे. ग्राहक किंमत निर्देशांकात (CPI) अन्नधान्याचा वाटा अंदाजे ४० टक्के असतो. त्यामुळे, या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे एकूण किरकोळ महागाईवरही दबाव वाढतो.
महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ
ऑक्टोबरमध्ये ज्या वस्तूंच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली, त्या यादीत कांदा अग्रस्थानी होता. कोणत्या पहिल्या पाच वस्तूंच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली हे शोधण्यासाठी आपण माहितीचे विश्लेषण करूया. या सर्व वस्तू सामन्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. यापैकी पाच नियमित वापरले जाणारे स्वयंपाकघरातील पदार्थ असून महागाईमुळे आता सामन्यांना नक्की किती त्रास सोसावा लागणार आहे हाच प्रश्न समोर आला आहे.
| गोष्टी | किती महागले? |
| कांदा | 116.22% |
| लसूण | 60.74% |
| आलं | 48.32% |
| लिंबू | 47.30% |
| चांदीचे दागिने | 52.39% |
| महिना | महागाई दर |
| ऑक्टोबर 2025 | 0.25% |
| नोव्हेंबर 2025 | 0.71% |
| डिसेंबर 2025 | 1.33% |
| जानेवारी 2026 | 2.74% |
| फेब्रुवारी 2026 | 3.21% |
| मार्च 2026 | 3.40% |
| एप्रिल 2026 | 3.48% |
| मे 2026 | 3.93% |
| जून 2026 | 4.38% |
| जुलै 2026 | 4.44% |
| ऑगस्ट 2026 | 4.83% |
| सप्टेंबर 2026 | 5.54% |
| ऑक्टोबर 2026 | 6.09% |
किरकोळ महागाई २ ते ६ टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी आरबीआयवर आहे. ऑक्टोबरमध्ये महागाईने ही मर्यादा ओलांडली. यामुळे मध्यवर्ती बँकेपुढील व्याजदरांसंबंधीची आव्हाने वाढू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ऑक्टोबरमध्ये आरबीआयने जवळपास चार वर्षांनंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करून तो ५.५० टक्क्यांवर नेला होता.
२ ते ४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत ऑक्टोबरमधील महागाईची आकडेवारी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जर महागाईचा दबाव कायम राहिला, तर व्याजदरात आणखी बदल करण्याच्या शक्यतेवर चर्चा होऊ शकते.
Ans: किरकोळ महागाई ६ टक्क्यांनी वाढली आहे
Ans: महागाईचा सर्वाधिक परिणाम हा सर्वसामन्यांवर होणार आहे
Ans: RBI वर यामुळे जास्त दबाव येणार आहे