
Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र वातावरण, 'या' स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांचं लक्ष
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात किंचीत घसरण! तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या
भारतीय शेअर बाजार शुक्रवारी किरकोळ घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २६,२०० च्या वर राहिला. सेन्सेक्स १३.७१ अंकांनी म्हणजेच ०.०२% ने घसरून ८५,७०६.६७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२.६० अंकांनी म्हणजेच ०.०५% ने घसरून २६,२०२.९५ वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक १५.४० अंकांनी किंवा ०.०३% ने वाढून ५९,७५२.७० वर बंद झाला.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एचडीएफसी बँक, लेन्सकार्ट, एनसीसी, वारी एनर्जीज, ग्रोव, जेके टायर, टाटा टेक्नॉलॉजीज, वारी एनर्जीज, तेजस नेटवर्क्स, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये लॉरस लॅब्स, एसआरएफ आणि एलटी फूड्स यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये अक्युटास केमिकल्स, सेनोरेस फार्मास्युटिकल्स, लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स, झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस आणि डॉ. अग्रवाल हेल्थ केअर यांचा समावेश आहे.
सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) बाजारातील या तज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली. शिफारस करण्यात आलेल्या स्टॉक्समध्ये लॉरस लॅब्स लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, पिरामल फार्मा लिमिटेड, आरबीएल बँक लिमिटेड, अॅस्ट्रल लिमिटेड, एचबीएल इंजिनिअरिंग लिमिटेड, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड आणि इंडो काउंट इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.
सोमवारी क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे व्यापक विक्रीला नवीन गती मिळाली जी आता स्थिरावल्याचे दिसून आले. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, आशियातील सुरुवातीच्या व्यापारात बिटकॉइन ४.३% ने घसरून $८८,००० च्या खाली आला, तर इथर ६% ने घसरून $२,९०० च्या खाली आला.