Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अदानी पॉवरचा एक निर्णय आणि बांग्लादेशमधील अनेक शहरांची लाइट गुल, नेमके प्रकरण काय? जाणून घ्या

बांगलादेशच्या पॉवर ग्रिड बांगलादेश पीएलसीच्या डेटावरून असे दिसून आले आहे की देशातील अनेक शहरे अंधारात बुडत आहेत, कारण सुमारे 1600 मेगावॅट वीज कमी होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 02, 2024 | 05:12 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा शेजारी देश म्हणजेच बांगलादेशवर विजेचे संकट निर्माण झाले आहे. अदानी पॉवर झारखंड लिमिटेड (APGL) ने $846 दशलक्ष बिलाच्या थकबाकीमुळे बांगलादेशला लागणारा वीज पुरवठा निम्म्याहुन कमी केला आहे. अदानी पॉवर झारखंड लिमिटेड (APJL) ही वीज कंपनी अदानी पॉवरची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे, त्यांनी गुरुवारी रात्रीपासून त्यांच्या पॉवर प्लांटमधून वीज पुरवठा कमी केला आहे, त्यामुळे बांगलादेशला एकूण गरजेपेक्षा कमी वीज पुरवठा होत आहे.

अंधारात पडला बांगलादेश

‘डेली स्टार’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पॉवर ग्रिड बांगलादेश पीएलसीच्या आकडेवारीवरून असे समोर आले आहे की बांगलादेशातील अनेक शहरे अंधारात गेली आहेत. याचे कारण म्हणजे सुमारे 1600 मेगावॅट वीज कमी होत आहे. बांगलादेशमध्ये गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान रात्री 1600 मेगावॅटपेक्षा जास्त विजेचा तुटवडा जाणवला होता. सुमारे 1496 मेगावॅट क्षमतेचा अदानी पॉवरचा प्लांट आता एका युनिटमधून केवळ 700 मेगावॅट वीज निर्मिती करत आहे. त्यामुळेच आधीच भयंकर राजकीय संकटाचा बळी ठरलेला शेजारी बांगलादेश आता नव्या या समस्येला तोंड देत आहे.

हे देखील वाचा: चांगल्या रिटर्न्ससाठी टॅक्स फ्री सरकारी बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करणं योग्य? ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

अदानी पॉवर काय म्हणते

अदानी पॉवरने सांगितले की PDB म्हणजेच बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डालाने बांगलादेश कृषी बँकेकडून ना $ 170 दशलक्ष कर्जाची सुविधा दिली नाही आणि ना $ 846 दशलक्षची थकबाकी भरली, ज्यामुळे कंपनीला बांग्लादेशात वीज कपात करावी लागली.

अदानी पॉवरने पाहिलेच पत्र लिहून थकीत बिल भरण्यास केले होते सूचित

वीज कपातीची परिस्थिती येण्यापूर्वी अदानी कंपनीने बांगलादेशच्या ऊर्जा सचिवांना पत्र लिहून बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाला 30 ऑक्टोबरपर्यंत थकबाकीची रक्कम भरण्यास सांगितले होते. थकीत बिले न भरल्यास वीज खरेदी करारांतर्गत कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असे अदानी समूहाच्या कंपनीने 27 ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने अदानी पॉवरने 31 ऑक्टोबरला बांगलादेशमधील वीजपुरवठा खंडित केला.

हे देखील वाचा: PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार? लाभ मिळवण्यासाठी करा हे काम

बांगलादेश पेंडिंग पेमेंट का देऊ शकत नाही?

पीडीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा पीडीबीने कोळशाच्या किंमतीबाबत प्रश्न उपस्थित केला तेव्हा एक पूरक करार करण्यात आला होता. त्यातच अदानी समूहाच्या कंपनीला इतर कोळशावर आधारित वीज प्रकल्पांकडून आकारण्यात येणाऱ्या दरापेक्षा कमी दर ठेवण्यास भाग पाडले. अहवालानुसार, पुरवणी कराराचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अदानी पॉवरने पुन्हा वीज खरेदी करारानुसार शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Why adani power cuts half of bangladesh electricity supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 05:12 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Business News

संबंधित बातम्या

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा
1

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या
2

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा
3

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Ola Electric च्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २३ टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का?
4

Ola Electric च्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २३ टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.