फोटो सौजन्य: iStock
एकीकडे सोन्याची किंमत रोज नवनवे शिखर गाठत असताना दुसरीकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये अस्थिरता पायाला मिळत आहे. अनेक जण आता शेअर मार्केट व्यतीरिक्त अन्य ठिकणी गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहे. काही जण म्युचल फंडस्कडे एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत आहे. पण त्यातही जोखीम असल्याकारणाने अनेक जण त्यात गुंतवणुक करण्यास कचरत आहे.
खरंतर आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, काही काळापासून बॉण्ड्सने बाजारात खूप चांगला परतावा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) व्याजदर कमी करण्याच्या अपेक्षेने टॅक्स फ्री बॉण्ड चांगलेच चमकले आहेत.
गुंतवणूकदार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर टॅक्स फ्री बॉण्डमध्ये गुंतवणूक करू शकतात. सध्या काही टॅक्स फ्री बॉण्ड शेअर बाजारात चांगली कामगिरी करत आहेत. या बॉण्ड्सचे यील्ड देखील खूपच आकर्षक आहे. याशिवाय हे सुरक्षित आणि रेग्युलर इन्कमवाले बॉण्ड आहेत.
जे गुंतवणूकदार जास्त टॅक्स स्लॅबमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा बाँड गुंतवुकीचा एक चांगला पर्याय आहे.
बाजारातील एकूण 14 इन्फ्रास्टक्चर सरकारी कंपनीज जसे की NHAI, IRFC आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) इ. यांनी करमुक्त बाँड जारी करतात. या बॉण्डची ट्रेडिंग मुख्य स्टॉक एक्स्चेंजवर केली जाते.
हे बाँड्स 2012 ते 2016 दरम्यान जारी करण्यात आले होते. हे 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षांसाठी जारी केले गेले. विशेष म्हणजे या बाँडवर दरवर्षी व्याज दिले जाते. यातील जवळपास सर्व बॉण्ड्सना AAA रेटिंग मिळाले आहे.
हे देखील वाचा: भविष्याचा विचार करता गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या
गुंतवणुकीसाठी टॅक्स फ्री बॉण्ड हा एक चांगला पर्याय आहे. वास्तविक यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. याशिवाय हा बाँड सरकारी कंपनीजकडून जारी केला जातो, त्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्या गुंतवणूकदारांना त्यांची सेविंग सुरक्षित करायची आहे आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळवायचे आहे त्यांच्यासाठी हा बाँड एक चांगला पर्याय आहे.
जर तुम्ही टॅक्स फ्री बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीची लिक्विडिटी आणि यील्ड टू मैच्योरिटी (YTM) लक्षात ठेवा. YTM म्हणजे बाँडचा वार्षिक परतावा. तुम्ही या बॉण्डमधील गुंतवणूक मॅच्युरिटी होईपर्यंत गुंतवणूक करावी.