Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात गव्हाचे दर का वाढतायेत? दरातील तेजीमागे नेमकं कारण काय? वाचा… सविस्तर!

गेल्या काही काळापासून देशातील गहू बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय गहू उत्पादनातील घटीमुळे गहू दर तेजीत असून, भारतातील गहू दरवाढीला आंतराराष्ट्रीय बाजारातील तेजीची किनार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 21, 2024 | 05:51 PM
देशात गव्हाचे दर का वाढतायेत? दरातील तेजीमागे नेमकं कारण काय? वाचा... सविस्तर!

देशात गव्हाचे दर का वाढतायेत? दरातील तेजीमागे नेमकं कारण काय? वाचा... सविस्तर!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून देशातील गहू दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा संबंध असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. प्रामुख्याने चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि युक्रेन हे देश जागतिक गहू उत्पादनात आघाडीवरील देश आहेत. मात्र, प्रमुख गहू निर्यातदार देश असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये यावर्षी गहू उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली आहे. ज्याचा थेट परिणाम जागतिक गहू उत्पादनावर झाला असून, कमी उत्पादनाअभावी दरात तेजी पाहायला मिळत आहे. परिणामस्वरूप, भारतात देखील काही काळापासून गहू दरात तेजी पाहायला मिळत आहे.

गहू बाजारात दोन्ही देशांचा हिस्सा

युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु आहे. जे अजूनही संपलेले नाही. विशेष म्हणजे युद्धसदृश्य परिस्थितीमुळे यावर्षी या दोन्ही देशांतील गहू उत्पादनात मोठी घट झाली आहे. जागतिक गहू बाजारात दोन्ही देशांचा हिस्सा हा जवळपास 25 टक्के इतका आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांपासून युद्धजन्य परिस्थितीमुळे या दोन्ही देशांमध्ये गहू उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात गहू बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. ज्याचा थेट परिणाम हा भारतीय गहू बाजारावर देखील पाहायला मिळत असून, भारतीय बाजारात गहू दरात तेजी दिसून येत आहे.
(फोटो सौजन्य : istock)

देशांतर्गत उत्पादनातही घट

सध्याच्या घडीला देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाला 2500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याउलट केंद्र सरकारने मागील वर्षीच्या रब्बी हंगामात गव्हासाठी 2275 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी भारतात एल-निनोच्या प्रभावामुळे देशातील गहू उत्पादन मोठया प्रमाणात घटले होते. केंद्र सरकारने मागील वर्षीच्या रब्बी हंगामात एकूण 372.9 लाख मेट्रिक टन गहू उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले होते. ज्यात सरकारला केवळ 265 लाख टन गहू उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यात यश आले आहे. अर्थात देशांतर्गत गहू उत्पादनात देखील घट नोंदवली गेली. ज्याचा थेट परिणाम हा गहू दरांवर झाला असून, तेजी पाहायला मिळत आहे.

रशिया-युक्रेनचे गहू उत्पादन घटले

अमेरिकी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, रशियामध्ये 2023-24 मध्ये 91.50 दशलक्ष मेट्रिक टन (915 लाख मेट्रिक टन) गहू उत्पादन झाले आहे. जे 2024-25 मध्ये 83.0 दशलक्ष मेट्रिक टन (830 लाख टन) इतके कमी नोंदवले गेले होते. त्याचप्रमाणे, युक्रेनमध्ये 2023-24 मध्ये 230 लाख टन गहू उत्पादन झाले होते. जे 2024-25 मध्ये 195 लाख टन इतके कमी नोदवले गेले आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येत आहे. परिणामी भारतातही गहू दर तेजीत पाहायला मिळत आहे.

Web Title: Why are the wheat prices increasing in india read reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • Business News
  • Wheat Prices

संबंधित बातम्या

Suzlon Energy: सुझलॉन एनर्जी दिवाळीपूर्वी गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय, 5 वर्षात दिला 1951 टक्क्यांचा भरघोस परतावा
1

Suzlon Energy: सुझलॉन एनर्जी दिवाळीपूर्वी गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय, 5 वर्षात दिला 1951 टक्क्यांचा भरघोस परतावा

2047 पर्यंत 80 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1.5 कोटी सागरी रोजगाराच्या संधी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा
2

2047 पर्यंत 80 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1.5 कोटी सागरी रोजगाराच्या संधी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

Stocks to Buy on Diwali: स्विगी, टीव्हीएस मोटरसह ‘या’ शेअर्समध्ये तेजीचे संकेत; ब्रोकरेजने दिले नवे लक्ष्य
3

Stocks to Buy on Diwali: स्विगी, टीव्हीएस मोटरसह ‘या’ शेअर्समध्ये तेजीचे संकेत; ब्रोकरेजने दिले नवे लक्ष्य

Share Market Closing: बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील दबावामुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 297 अंकांनी खाली, निफ्टी 25145 वर बंद
4

Share Market Closing: बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील दबावामुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 297 अंकांनी खाली, निफ्टी 25145 वर बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.