Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहकर्ज, कार लोन स्वस्त होणार का? वाचा… काय म्हटलंय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी…

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याजदरात कपातीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्या व्याजदर कमी करणे घाईचे आणि अतिशय जोखमीचे आहे, असे ते म्हणाले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 19, 2024 | 04:18 PM
गृहकर्ज, कार लोन स्वस्त होणार का? वाचा... काय म्हटलंय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी...

गृहकर्ज, कार लोन स्वस्त होणार का? वाचा... काय म्हटलंय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी...

Follow Us
Close
Follow Us:

गृहकर्ज आणि कार लोन स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्या लोकांची थोडी निराशा होऊ शकते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याजदरात कपातीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्या व्याजदर कमी करणे घाईचे आणि अतिशय जोखमीचे आहे, असे ते म्हणाले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये रेपो दरात कपात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने आपल्या पतधोरणात रेपो दरात कपात केलेली नव्हती. अशातच आता पुन्हा एकदा शक्तीकांत दास यांनी हे वक्तव्य केल्याने, व्याजदर कपातीची शक्यता पुर्णत: मावळली आहे.

डिसेंबरमध्ये व्याजदर कमी होण्याची होती शक्यता

आरबीआय डिसेंबरमध्ये आपल्या पतधोरणात समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात कपात करू शकते, असे मानले जात होते. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. एमपीसीची बैठक दर दोन महिन्यातून एकदा होते. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या १८ ऑक्टोबरच्या वक्तव्यानंतर डिसेंबरमध्ये व्याजदरात घट होण्याची शक्यता धुसर झाली आहे.

हे देखील वाचा – यंदा मुहूर्त ट्रेडिंग 31 ऑक्टोबरला होणार की 1 नोव्हेंबरला? जाणून घ्या… काय असेल नेमकी तारीख!

दर का कमी केले गेले नाहीत?

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे की, आम्ही निर्णय घेण्यात मागे नाही. भारताच्या विकासावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारताचा विकास दर ७.२ टक्के राहीलच. विकास दर कायम आहे, महागाई देखील कमी होत आहे, तरीही काही धोके आहेत. त्यामुळे व्याजदरात कपात करणे घाईचे आणि जोखमीचे ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महागाई कमी होण्याची शक्यता आहे, पण त्याच्या दृष्टीकोनात काही मोठे धोके देखील आहेत, असे दास मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

हे देखील वाचा – टेक महिंद्राच्या नफ्यात तब्बल 153.5 टक्क्यांनी वाढ; कंपनी गुंतवणुकदारांना देणार लाभांश!

महागाई आटोक्यात आणण्यावर भर

रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरच्या सुरुवातीला सादर केलेल्या पतधोरणात रेपो दरात बदल केलेला नसला, तरी पतधोरणाबाबतची भूमिका बदलली. त्यांनी आपली भूमिका बदलून ‘विड्रॉल ऑफ अॅकॉमोडेशन’ ऐवजी ‘न्यूट्रल’ अशी केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी किरकोळ महागाई नियंत्रणात आणण्यावर आपला भर राहील, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते.

Web Title: Will home loans car loans become cheaper governor shaktikanta das

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • RBI

संबंधित बातम्या

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न
1

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न

ATM Safety Facts: एटीएममधील ‘Cancel’ बटण दोनदा दाबल्याने PIN सुरक्षित राहतो का? जाणून घ्या सत्य!
2

ATM Safety Facts: एटीएममधील ‘Cancel’ बटण दोनदा दाबल्याने PIN सुरक्षित राहतो का? जाणून घ्या सत्य!

UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण
3

UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण

Dormant Account Activation: तुमचे खाते बंद झालेय? पुन्हा सक्रिय करण्यासाठी वाचा ही माहिती
4

Dormant Account Activation: तुमचे खाते बंद झालेय? पुन्हा सक्रिय करण्यासाठी वाचा ही माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.