गाड्यांंच्या किंमती कमी होणार? केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांचा वाहन उद्योगाला मोलाचा सल्ला, वाचा... सविस्तर!
गेल्या दशकभरात देशातील वाहनांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ज्यामुळे वाहन उद्योग काहीशी मंदी अनुभवतो आहे. देशातील वाहन कंपन्या येत्या काही दिवसांत आपाआपल्या पातळीवर वाहनांच्या किंमतीत कपात करू शकतो. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या कंपन्यांना कार विक्रीतील घसरण आणि मंदीचा सामना करण्यासाठी वाहनांच्या किमती कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता लवकरच वाहन उद्योग हा याबाबत विचार करण्याची शक्यता आहे.
वाहनांच्या किंमती कमी करण्याचा सल्ला
एका महत्त्वाच्या समिटमध्ये वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल म्हणाले आहे की, ऑटो उद्योग खूप उच्च मार्जिनवर बसला आहे. देशांतर्गत ऑटो मार्केटच्या वाढीला चालना देण्यासाठी या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती कमी केल्या पाहिजेत. स्टॉक एक्स्चेंजवर नुकतेच सूचीबद्ध झालेल्या ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीकडे लक्ष वेधून पीयूष गोयल म्हणाले आहे की, नुकत्याच स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झालेल्या ऑटो कंपनीने 25 वर्षांपूर्वी 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती. कंपनीने या गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला आहे.
तर कंपन्यांचा नफा देखील वाढणार
गेल्या 10 वर्षांत कंपनीने मूळ कंपनीला लाभांश आणि रॉयल्टी म्हणून 12 ते 13 अब्ज डॉलर्स पाठवले आहेत. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये त्यांची स्वतःची होल्डिंग 15 अब्ज डॉलर्स इतकी आहे. वाहन कंपन्या त्यांच्या किंमतीबाबत अधिक स्पर्धात्मक झाल्या तर मला खात्री आहे की, त्यांना स्वत:साठी मोठी बाजारपेठ मिळू शकणार आहे. आणि त्यांचा नफा देखील वाढणार आहे. असेही वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल म्हणाले आहे.
हे देखील वाचा – देशाच्या निर्यातीत 17.25 टक्क्यांनी वाढ; 28 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर झेप!
भारतीय बाजारात कारला मोठी मागणी
भारतीय बाजारात कारला मोठी मागणी आहे. त्यामुळे गाड्यांच्या किमती वाजवी ठेवल्यास, त्याचा कंपन्यांनाच फायदा होणार आहे. अलीकडेच, मारुती सुझुकीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कारच्या विक्रीत घट झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, या सेगमेंटमधील कारची बाजारपेठ कमी होत आहे.
पीयूष गोयल यावेळी ह्युंदाई मोटर्सच्या आयपीओचा संदर्भ देत म्हणाले आहे की, जे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाले आहेत. कंपनीने 1965 रुपयांच्या इश्यू किंमतीने बाजारातून 27870 कोटी रुपये उभे केले आहेत. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ राहिला आहे.