छोट्या कंपनीच्या शेअरमधून 96 टक्क्यांचा परतावा; लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदार मालामाल!
आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१३) शेअर बाजारात जोरदार विक्री होत असताना, काही शेअर्समध्ये माेठी वाढ झाली आहे. असाच एक शेअर्स ओरिएंटल ॲरोमेटिक्सचा आहे. ओरिएंटल ॲरोमॅटिक्सचे शेअर जुलै-सप्टेंबर तिमाहीतील मजबूत निकालानंतर 17 टक्क्यांहून अधिक वाढून, 619 रुपयांवर पाेहाेचला आहे. या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 656 रुपये आहे. शेअरची ही किंमत 5 नोव्हेंबर 2024 रोजी होती. निफ्टीच्या 9 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत हा स्मॉलकॅप शेअर्स 42 टक्क्यांनी वाढला आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
हे देखील वाचा – शेअर बाजारातील घसरण सुरुच; सेन्सेक्स 984.23 अंकांनी तर निफ्टी 324.40 अंकांनी घसरला
एकूण उत्पन्नात वार्षिक 4 टक्के वाढ
ओरिएंटल ॲरोमॅटिक्सच्या एकूण उत्पन्नात वार्षिक 4 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत उत्पन्न 2,389 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 2,296 कोटी रुपये होते. कंपनीचा निव्वळ नफा 6 पटीने वाढून, 163 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 25 कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीचा एकूण खर्च मागील वर्षीच्या 2,261 कोटी रुपयांवरून 2,179 कोटी रुपयांवर घसरला आहे.
हे देखील वाचा – आरबीआयने एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंकांचा केला ‘या’ सुचीमध्ये समावेश!
काय करते ही कंपनी
ओरिएंटल ॲरोमॅटिक्स विविध प्रकारचे टेरपीन रसायने आणि इतर विशेष सुगंधी रसायने तयार करते. याशिवाय कंपनी सिंथेटिक कापूर, टेरपीनॉल्स, पाइन ऑइल, रेझिन्स, ॲस्ट्रॉलाइड, डायहाइड्रोमायर्कॅनॉल आणि इतर अनेक रसायनांचा व्यवहार करते. हे फ्लेवर्स आणि सुगंध, फार्मास्युटिकल्स, साबण आणि सौंदर्यप्रसाधने, रबर आणि टायर, पेंट आणि वार्निश इत्यादींमध्ये वापरले जाते.
शेअरहोल्डिंग पॅटर्न
सप्टेंबरच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा 74.17 टक्के आहे. तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) त्यांची होल्डिंग मागील तिमाहीत 0.1 टक्क्यांवरून 0.05 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.
शेअर बाजारात विक्री
भारतीय शेअर बाजार विक्रीच्या स्थितीत आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला आणि 78000 अंकांच्या खाली गेला. त्याचप्रमाणे निफ्टीमध्येही घसरण दिसून आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)