फोटो सौजन्य - Social Media
भारतीय विद्या भवन संचालित एस.पी. जैन ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SPJIMR) ने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM) आणि बिझनेस मॅनेजमेंट (PGDM-BM) या कोर्सेससाठी २०२३-२५ च्या बॅचसाठी १००% प्लेसमेंट मिळवले आहे. या बॅचमधील ३३६ विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील ८६ कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी वार्षिक पगार ₹३२ लाख तर मध्यम पगार ₹३०.५ लाख इतका होता. सर्वाधिक पगार ₹८१ लाख (देशांतर्गत) तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ₹८९ लाख होता. यामध्ये ९०% विद्यार्थ्यांना ₹२५ लाखांपेक्षा अधिक पगाराच्या ऑफर्स मिळाल्या.
प्लेसमेंटची वैशिष्ट्ये:
कन्सल्टिंग क्षेत्रात ४०% विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले, ज्यामध्ये बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, डेलॉईट आणि अॅक्सेंचर सारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश होता. एफएमसीजी क्षेत्रात हिंदुस्थान युनिलिव्हर, पीअँडजी, आणि नेस्ले यांसारख्या कंपन्यांनी ३३% विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या. बीएफएसआय क्षेत्रातील ३०% विद्यार्थ्यांना मॉर्गन स्टॅन्ले, एचएसबीसी आणि कोटक महिंद्रा सारख्या कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील ३६% विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट संबंधित नोकऱ्या मिळाल्या, तर १५% विद्यार्थ्यांनी जनरल मॅनेजमेंट क्षेत्रात स्थान मिळवले. ऑटमन इंटर्नशिप दरम्यान, ७५ कंपन्यांनी सहभाग घेतला. सरासरी स्टायपेंड ₹३.१५ लाख (दोन महिने) तर उच्चतम ₹४.४ लाख होती.
एसपीजेआयएमआरचे डीन डॉ. वरूण नागराज इन्स्टिट्यूटच्या प्लेसमेंटमधील कामगिरीविषयी म्हणाले, “संदिग्धतेच्या परिस्थितीतही न घाबरता आपल्या सुसज्जपणे कोणतेही काम यशस्वी करणारे तसेच ज्ञानवान, संशोधक, जबाबदार, जमिनीवर पाय असलेले इंडस्ट्रीतील नेतृत्व विकसित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या इंडस्ट्रीतील भागीदारांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये केलेल्या कामाचे विशेष मोल लक्षात घेऊन ते आमच्याबरोबर खंबीरपणे जोडलेले आहेत याचा मला आनंद वाटतो.”
इंडस्ट्रीतील भागीदार कंपन्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना असोसिएट डीन रेणूका कामत म्हणाल्या, “आमच्या विद्यार्थ्यांमधील कौशल्य, त्यांच्यातील नेतृत्व क्षमता यांचे मोल समजून घेऊन नेहमीप्रमाणे आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आमच्या इंडस्ट्रीतील भागीदार आणि रिक्रूटर कंपन्यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्या सहभागाने आम्हाला सातत्याने १०० टक्के प्लेसमेंट्स करण्यास मदत होतेच, शिवाय बिझनेस कम्युनिटीशी असलेले इन्स्टिट्यूटचे संबंधही वृद्धिंगत होत आहेत.”
बदलत्या वैश्विक व्यवसायाच्या वातावरणात उत्कृष्टता आणि लवचिकता असलेलं मनुष्यबळ तयार करण्यात एसपीजेआयएमआर प्रवीण असल्याचे इन्स्टिट्यूटच्या २०२३-२०२५ बॅचच्या प्लेसमेंटमधून सिद्ध झाले आहे. अद्वितीय कॉम्पेन्सेशन आउटकम, प्लेसमेंट देणाऱ्यांच्या यादीतील इंडस्ट्रीतील आघाडीच्या कंपन्या आणि १०० टक्के प्लेसमेंटचा दर या माध्यमातून एसपीजेआयएमआर मॅनेजमेंट एज्युकेशनमधील नवे स्टँडर्ड्स अबाधित राखत आहे. ग्रॅज्युएट्सना संस्थेत आत्मविश्वास आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाकडून शिकण्याची संधी मिळते. प्लेसमेंट सायकलमुळे भविष्यातील इंडस्ट्रीतील नेतृत्वाच्या शोधात असलेल्या रिक्रूटर कंपन्यांमध्ये एसपीजेआयएमआरची प्रतिमा इंडस्ट्रीत कामासाठी तयार उमेदवार देणारे इन्स्टिट्यूट अशी झाली आहे आणि त्यामुळे त्या रिक्रूटमेंटला प्राधान्यही देत आहेत.