Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील नायर दंत महाविद्यालयात १८ वी जागतिक दंत विज्ञान परिषद आयोजित! तब्बल पाच मानाचे पुरस्कार पटकावले

कल्याणमध्ये अॅप-आधारित वाहतुकीला प्रतिसाद म्हणून टेरिफ मीटरप्रमाणे रिक्षा सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रात कल्याणच्या यश ढाकणेने राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 20, 2025 | 07:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘दंतचिकित्सेचे भविष्य’ या थीमवर आधारित हा दोन दिवसीय कार्यक्रम
  • आधुनिक दंत उपचार पद्धती, संशोधनातील नव्या घडामोडी आणि मौखिक आरोग्याच्या बदलत्या मानकांवर केंद्रित
  • पियर फुकार्ड अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गॅबी कास्पो यांच्या सहभागामुळे या परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिरिक्त प्रतिष्ठा
मुंबईतील नायर दंत महाविद्यालयात आयोजित १८ वी जागतिक दंत विज्ञान आणि मौखिक आरोग्य परिषद तसेच पियर फुकार्ड अकॅडमी आशिया-पॅसिफिक परिषद व पुरस्कार सोहळा यंदा भव्यदिव्य उत्साहात पार पडला. जगभरातील दंत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, देशातील दंत महाविद्यालयांमधील विद्यार्थी-प्राध्यापक आणि तज्ञांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ‘दंतचिकित्सेचे भविष्य’ या थीमवर आधारित हा दोन दिवसीय कार्यक्रम आधुनिक दंत उपचार पद्धती, संशोधनातील नव्या घडामोडी आणि मौखिक आरोग्याच्या बदलत्या मानकांवर केंद्रित होता. अमेरिकेतून विशेष उपस्थिती दर्शविणारे पियर फुकार्ड अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गॅबी कास्पो यांच्या सहभागामुळे या परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिरिक्त प्रतिष्ठा लाभली.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन!

या भव्य सोहळ्यात नायर दंत महाविद्यालयाने आपली गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि रुग्णसेवा यातील उत्कृष्टता पुन्हा एकदा सिद्ध करत पाच मानाचे पुरस्कार पटकावले. राज्यातील अग्रगण्य दंत शिक्षण संस्था म्हणून आपली ओळख अधिक भक्कम करत महाविद्यालयाला तीन मुख्य विभागांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम दंत शिक्षण संस्था, सर्वोत्तम शैक्षणिक व संशोधन कार्य, तसेच सर्वोत्तम रुग्ण सेवा हे तीन पुरस्कार मिळाले. या तिन्ही श्रेणी संस्थेच्या सर्वांगीण कार्यक्षमतेचे प्रतिबिंब असून, विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापक आणि रुग्णसेवा विभागाच्या सततच्या प्रयत्नांचे द्योतक आहेत.

याशिवाय, महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री डॉ. नीलम अन्द्राडे यांना दंतचिकित्सा क्षेत्रातील दीर्घकालीन योगदान, नेतृत्वगुण आणि उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. तसेच ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना दुसऱ्या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले. हा दुहेरी सन्मान संस्थेच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि प्रगतीशील दृष्टीकोन अधोरेखित करणारा आहे.

परिषदेत केवळ वरिष्ठ तज्ञच नव्हे तर विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. नायर दंत महाविद्यालयातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी संशोधन सादरीकरणे, पोस्टर प्रेझेंटेशन आणि शैक्षणिक कामगिरीतून चमकदार यश मिळवत स्वतंत्र पुरस्कार पटकावले. विद्यार्थ्यांची ही कामगिरी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, मार्गदर्शन आणि संशोधन संस्कृती उच्च दर्जाची असल्याचे स्पष्टपणे दर्शवते.

विद्यार्थ्यांसाठी आत्मसंरक्षण व फिटनेस प्रशिक्षण! मार थोमा विद्यापीठात अनोखा उपक्रम

पाचही पुरस्कारांची कमाई, अधिष्ठात्रींचा दुहेरी सन्मान आणि विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश यामुळे नायर दंत महाविद्यालयाने पुन्हा एकदा राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही दंत शिक्षण क्षेत्रात आपले वर्चस्व आणि प्रतिष्ठा सिद्ध केली आहे. परिषदेत मांडले गेलेले संशोधन निष्कर्ष आणि नव्या उपचार पद्धतींची देवाणघेवाण यामुळे दंतचिकित्सेचे भविष्य अधिक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक होणार असल्याचा विश्वास वारंवार व्यक्त करण्यात आला.

Web Title: 18th world dental science conference organized at nair dental college mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 07:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.