
फोटो सौजन्य - Social Media
Under 16 तसेच Under 14 , असे दोन सामने भरवण्यात आले होते. १६ वर्षांखालील सामन्यात मुलीनाच्या गटात अंतिम फेरीत होकुळधाम हायस्कुलने ठाकूर इंटरनॅशनल शाळेला लढा दिला आणिक या फेरीत विजय प्राप्त करत गोकुळधाम हायस्कुल लक्ष्मी करंडकाचा मानकरी ठरला. तर आर्यन एज्युकेशन स्कुलने बालमोहन करंडक जिंकला.
१४ वर्षांखालील मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या सामन्यांमध्ये IES न्यू इंग्लिश शाळेने गोकुळधाम हायस्कुलशी लढा दिला आणि या फेरीत विजय प्राप्त करत गोकुळधाम हायस्कुलचा तब्बल सहा गुणांनी पराभव केला. तर मुलांच्या गटात नालंदा पब्लिक स्कुलने विजय प्राप्त केला. मुलांच्या गटामध्ये अंतिम फेरीत नालंदा पब्लिक स्कुल आणि IES न्यू इंग्लिश स्कुल आमनेसामने दिसून आले होते. हा लढा इतका अटीतटीचा होता की कोण जिंकेल? असा प्रश्न उभा राहिला होता पण अनेक प्रयत्नांनी नालंदा पब्लिक स्कुलने अखेर बाजी मारली आणि IES न्यू इंग्लिश स्कुलचा एकूण २ गुणांनी पराभव केला.
या विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव तसेच विशेष उल्लेख
या सामन्यांमध्ये उपस्थित तसेच प्रत्येक स्पर्धकाने जीव ओतून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पण सगळ्यांनी उत्तम कामगिरी केलेली दिसून आली. अशात आर्शिन शेख, आर्या आरख, नितेश जाधव, आर्यन दुसार, उदित पाटील, आदित्य झगड्या तसेच तन्मय हुले यांचा विशेष उल्लेख करण्यात आला तसेच विजेत्यांना गौरवण्यात आले.